जीप ट्रकवर आदळल्याने चारजण मयत, पंढरपूर – सांगोला रस्त्यावर अपघात

पंढरपूर – पंढरपूर – सांगोला रस्त्यावर सातवा मैल (कासेगाव) येथे शुक्रवारी १२ फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता भीषण अपघात झाला असून यात एका लहान मुलीसह चार जण जागीच मयत झाले आहेत.
या अपघातामध्ये १ पुरुष, २ महिला, १ लहान मुलगी असे ४ जागीच मयत असून १पुरुष गंभीर जखमी असून उपचारासाठी त्यांना पंढरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . यातील मयत व जखमी हे चंदगड (जि. कोल्हापूर )येथील आहेत.
हा अपघात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पंढरपूर सांगोला रोडवर ७ वा मैल येथे घडला असून बोलेरो जीप रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला जोरात धडकली. यात चार इसम मयत व एक गंभीर जखमी आहे. इतर जखमी कॉटेज हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान यातील प्रवासी हे कोल्हापूर जिल्हयातून पंढरपूरला देवदर्शनासाठी येत होते. पंढरीनजीकच हा भीषण अपघात झाला.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!