पंढरपूर – सांगोला रस्त्यावरील सातवा मैल येथील अपघातातील मृतांची संख्या झाली पाच, अकराजण जखमी

पंढरपूर – पंढरपूर – सांगोला रस्त्यावर सातवा मैल (कासेगाव) येथे शुक्रवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी सहा वाजता भीषण अपघात झाला असून यात एका लहान मुलीसह पाचजण मृत्यूमुखी पडले आहेत तर अकराजण जखमी आहेत. जीपमध्ये एकूण सोळा प्रवासी प्रवास करत होते. दरम्यान जखमींना सोलापूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
या अपघातामध्ये 2 पुरुष, 2 महिला, 1 लहान मुलगी असे 5 मयत असून 11 जखमी असून उपचारासाठी त्यांना सोलापूरला हलविण्यात अआले आहे. यातील मयत व जखमी हे कर्नाटकातील बेळगाव भागातील तसेच कोल्हापूर जिल्हयातील चंदगड भागातील आहेत.
हा अपघात पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीत पंढरपूर सांगोला रोडवर 7 वा मैल येथे घडला असून कोल्हापूर भागातून येणारीबोलेरो जीप केए 04 एमबी 9476 ही रस्त्याच्या कडेला सांगोल्याकडे तोंड करून उभारलेल्या ट्रकला जीजे 03 डब्ल्यू 9355 ला जोरात धडकली. या अपघातामध्ये सखाराम धोंडिबा लांबोर वय 50, शादुबाई लक्ष्मण लांबोर वय 62 (रा. धनगरवाडी, धामणे बेळगाव कर्नाटक), पिंकी उर्फ सुनिता ज्ञानू लांबोर वय 11, नागुबाई काळू लांबोर वय 65, तुकाराम खंडू कदम वय 50, ता. चंदगड, कोल्हापूर हे पाच जण मयत झाले आहेत.
अकराजण जखमी असून यात धोंडिबा बापू लांबोर वय 87, कोंडदेवा बापू लांबोर वय 7, कोमल बापू लांबोर वय 7, बबन लांबोर वय 45, भारती बापू लांबोर वय 54, रोहित यशवंत कांबळे वय 20, बापू कलप्पा लांबोर वय 25, कोंडिबा विठ्ठल लांबोर वय 5, काळुलाल लांबोर वय 70, नागुबाई ग्यानू कोकरे वय 50, धोंडिबा सखाराम डोईफोडे वय 60. याचा समावेश आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम , पोलीस निरीक्षक किरण अवचर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.
दरम्यान यातील प्रवासी हे कोल्हापूर जिल्हयातून पंढरपूरला देवदर्शनासाठी येत होते. पंढरीनजीकच हा भीषण अपघात झाला.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!