धाराशिव कारखाना यंदा ४ लाख टन ऊस गाळणार, लवकरच आसवनी प्रकल्पही सुरू करणार : अभिजित पाटील

उस्मानाबाद – धाराशिव साखर कारखाना युनिट 1 हा 2020-21 च्या गळीत हंगामात चार लाख मे. टन उच्चांकी छस गाळप करणार असून संस्थेने कर्मचाऱ्यांना पगार वाढ दिली आहे. येत्या काळात शुगरकेन ज्युस ते इथेनॉल निर्मिती प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल यासाठी असावनी प्रकल्प उभारला जात आहे. हा यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला आणखी चांगला भाव मिळेल अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केली.

धाराशिव साखर कारखाना युनिट १ लि.
चोराखळी उस्मानाबादचा सन २०२०-२१चा “९वा बाॅयलर अग्निप्रदीपन” समारंभ आज पार पडला. चोराखळीचे मा. सरपंच, कारखान्याचे सभासद श्री.खंडेराव मैदांड व यांच्या सुविद्य पत्नी सौ.अरूणाताई मैदांड यांच्या हस्ते होम हवन पूजा संपन्न झाली.

यावेळी बोलताना अभिजित पाटील म्हणाले, कोरोनाच्या काळात शेतकरी हा आर्थिक दृष्ट्या अडचणीत आला आहे. मात्र यंदा पावसाने कृपादृष्टी दाखवल्याने पीकं, ऊस चांगल्याप्रकारे उत्पादित होईल. त्यामुळे ऊस टनेजमध्ये वाढ आहे. शेतकऱ्यांनी आजपर्यंत कारखान्यावर विश्वास ठेवून ऊस दिला तसेच सहकार्य यंदा ऊस देऊन सहकार्य करावे. असे आवाहन अभिजित पाटील यांनी केले.

कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंग पाळून कारखान्याची कामे अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पूर्ण केली आहेत. अनेक कामे अंतिम टप्यात असून गळीतासाठी कारखाना सज्ज असल्याचे पाटल यांनी सांगितले.

याप्रसंगी उस्मानाबाद जनता सहकारी बँकेचे चेअरमन ब्रिजलाल मोदाणी, व्हाईस चेअरमन विश्वासआप्पा शिंदे, मनसेचे सहकार सेनेचे शाॅडो सहकारमंत्री दिलीपबापू धोत्रे, अनंत आखाडे दाजी, डाॅ. जोगदंड, मनसेचे शशिकांत पाटील, सोमनाथ राऊत, रविराजे देशमुख, अभिजित हुबे, सरपंच बाबा साठे यावेळी कारखान्याचे संचालक रणजित भोसले, दीपक आदमिले, विकास काळे,रामभाऊ राखुंडे व कर्मचारी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!