पंढरपुरातून शुक्रवारपासून पुणे, मुंंबईसह लांब पल्ल्याच्या बसेस धावणार, सोलापूरसाठीही फेर्‍या वाढविल्या

पंढरपूर – कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे कडक निर्बंध सर्वत्र लावण्यात आल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ही प्रवाशांअभावी आगारातच उभ्या होत्या. आता जिल्हानिहाय आढावा घेवून अनलॉक सुरू आहे. यामुळे आता पंढरपूर आगारातून पुणे, मुंबई , औरंगाबाद, शिर्डी, अहमदनगर, बीड, मेहकर, नाशिक, निजामाबाद, गुहागर साठी लांबपल्ल्याच्या बसेस शुक्रवार 18 जून पासून सुरू करण्यात येत आहेत. याच बरोबर अक्कलकोट, सोलापूर व टेंभुर्णीसाठी ही बसेसच्या फेर्‍या वाढविण्यात आल्या आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!