आनंद वार्ता : उजनीवर पर्जन्यराजाचे पुनरागमन, 36 मि.मी.ची नोंद

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणावर पावसाचे पुनरागमन झाले असून रविवारी रात्रौ येथे 36 मिलीमीटरची नोंद आहे. दरम्यान भीमा व नीरा खोर्‍यात अद्यापही दमदारपणे पर्जन्यराजा बरसलेला नाही.
सोमवारी सकाळपर्यंतच्या अहवालानुसार मुळा मुठा व भीमा उपखोर्‍यात काही धरणांवर किरकोळ स्वरूपाचे पर्जन्यमान नोंदले गेले आहे. यात वडीवळे 10, मुळशी 11, टेमघर 6, वरसगाव 10, पानशेत 11 मि.मी. अशी नोंद आहे. दरम्यान उजनीवर 36 मि.मी. पाऊस झाल्याने येथे पावसाळ्यात 1 जून पासून एकूण 73 मि.मी. पर्जन्याची नोंद आहे.
उजनी व परिसरात झालेल्या पावसामुळे मागील बारा दिवसात धरण जवळपास पाच टक्के वधारले आहे. सध्या उजनीची स्थिती वजा 17.63 टक्के अशी आहे. भीमा खोर्‍यात जेंव्हा दमदार पाऊस बरसेल व उपनद्यांचे पाणी भीमेत येण्यास सुरूवात होईल तेंव्हाच उजनीची पाणी पातळी झपाट्याने वाढेल.
*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 14/06/2021 at 6.00 hrs
RWL —— 489.580 m.
Water Sp.Area —172. 25 Sq.km.
*-Storage-*
Gross ——- 1535.36 M Cum.
——– (54.21 TMC)
Live ——– -267. 45 M Cum.
——— ( -9.44 TMC)
Live % ——– *-17.63 %*
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 36/73 mm.
Evaporation ——– 5.95 mm.
*Outflow :-*
1) Sina Madha LIS -00 cusecs.
2) Dahigaon LIS – 00 Cusecs.
3) Tunnel – 00 cusecs.
4) Main Canal – 00 Cusecs.
5) Power House – 00 Cusecs.
6) Spillway — 00 Cusecs.
7) River Sluices — 00 Cusecs.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!