पंढरपूरकरांसाठी नगरपरिषदेने सुरु केले ‘कम्युनिटी क्लिनिक’ 

पंढरपूर ,- कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाकडून संचार बंदी लागू करण्यात आली आहे. या संचार बंदीच्या कालावधीत पंढरपूर शहरात अनेक खासगी दवाखाने बंद आहेत. वातावरणातील बदलामुळे सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होत असतो. शहरातील नागरिकांना या आजारासाठी मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी ‘कम्युनिटी क्लिनिक सुरु करण्यात आले आहे.

कम्युनिटी क्लिनिक सुलेमान चाळ, नगरपालिका शाळा नं.12, पंढरपूर येथे सुरु करण्यात आले आहे. या क्लिनिकच्या कामकाजास नगराध्यक्षा साधना भोसले व प्रांतधिकारी सचिन ढोले यांच्या उपस्थितीत सुरु करण्यात आले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक गुरुदास अभ्यंकर, विवेक परदेशी ,नगपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते.

कम्युनिटी क्लिनिक मध्ये नगपालिकेच्या वतीने औषधांचा पुरवठा करण्यात येणार असून, याठिकाणी नगरपालिका तसेच खासगी डॉक्टर व वैद्यकीय कर्मचारी यांच्या सेवा उपलब्ध करुन देण्यात आल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी यावेळी दिली. तसेच सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास असणाऱ्या नागरीकांनी आपली तपासणी करुन घ्यावी, असे आवाहनही मुख्याधिकारी मानोरकर यांनी केले आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!