पंढरपुरातील १९२ जणांचे स्वँब तपासणी अहवाल प्रलंबितच

पंढरपूर – सलग दुसर्या दिवशी पंढरपूरमधील १९२ स्वँब तपासणी अहवाल प्रलंबित राहिले आहेत. शनिवारी ११ तारखेला जी स्थिती होती तिच आज १२ जुलै रोजी आहे. आजवर पंढरपूर व परिसरातील १०२३ जणांचे स्वँब कोरोना तपासणीसाठी घेण्यात आलेले आहेत. ८३१ अहवाल प्राप्त झाले असून ७८२ निगेटिव्ह तर   ४९ पाँझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. १९२ प्रलंबित आहेत.

आजवर२१ जणांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर २७ जण रूग्णालयात आहेत. यापैकी २३ वाखरीत तर ३ सोलापूर व १ सांगोल्यात उपचार घेत आहे.
कोरोनामुळे १ जण मयत झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!