भीमा खोर्‍यातील पाऊस उजनीच्या पथ्थ्यावर, उपयुक्त पातळीत आलेला प्रकल्प लवकरच टक्केवारीची शंभरी गाठण्याची आशा

पंढरपूर – भीमेच्या उपनद्या असणार्‍या इंद्रायणी, पवना, मुळा , मुठा यासह घोड नदीच्या परिसरात मागील चोवीस तासापासून तुफान पावसाने हजेरी लावली आहे. लोणावळा परिसरात मागील चोवीस 390 मिलीमीटर इतक्या पावसाची नोंद मागील चोवीस तासात झाली असून यामुळे इंद्रायणी नदीत मोठ्या प्रमाणात पाणी येईल व याचा फायदा आगामी काळात सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्‍या उजनी धरणाला होताना दिसेल. हा प्रकल्प गुरूवारी 22 जुलैला सायंकाळी सह वाजता उपयुक्त पातळीत आला.

सायंकाळी सहा वाजता उजनीत दौंडजवळून १५ हजार ३८५ क्युसेक पाणी मिसळत होते तर पुणे बंडगार्डन चा विसर्ग २७ हजार क्युसेक होता. याचा येत्या दोन दिवसात उजनीला चांगला फायदा होईल.
भीमा खोर्‍यात सुरू असलेला पाऊस पाहता उजनी धरणात आता मोठ्या प्रमाणात पाणी येईल असे दिसत आहे. मागील काही दिवसातील पावसामुळे पुणे जिल्ह्यातील प्रकल्प वेगाने भरले असून कलमोडी धरण 100 टक्के भरल्यातून यातून 5 हजार 900 क्युसेक पाणी सोडले गेले आहे. याचबरोबर कासारसाई प्रकल्प 97 टक्के भरला असल्याने यातून 3300 क्युसेकचा विसर्ग सुरू आहे. दरम्यान मुळा मुठा खोर्‍यात दमदार पावसाची हजेरी असल्याने खडकवासला 72 टक्के भरले आहे तर साखळी धरणातील मागील पानशेत, टेमघर, वसरगाव ही धरण भरू लागली आहेत.भीमा खोर्‍यातील आंध्रा 86 टक्के तर वडीवळे 78 टक्के भरले आहे. मुळशी हा मोठा प्रकल्प असून तो 38 टक्के तर पवना 55 टक्के भरले आहे. भीमा उपखोर्‍यातील चासकमानमध्ये 42.25 टक्के जलसाठा झाला आहे.घोड उपखोर्‍यातही पावसाचा जोर असून येडगाव 47.36, वडज 52.63 तर डिंभे 43.68 टक्के भरले असून वडजमधून 3 हजार 900 क्युसेक पाणी पुढे सोडले गेले आहे.
दरम्यान उजनी प्रकल्प गुरूवारपासून आता उपयुक्त पातळीत भरणार असून जुलै महिन्याच्या तिसर्‍या अथवा चौथ्या आठवड्यात प्रतिवर्षी हा प्रकल्प मृतसाठ्यातून बाहेर येतो आणि नंतर ऑगस्ट व सप्टेंबर दरम्यान क्षमतेने भरतो. आता भीमा खोर्‍यात सुरू असलेला पाऊस व तेथील धरणांची स्थिती पाहता उजनीला लवकरच जास्त पाणी मिळेल असे दिसत आहे. कारण सर्वच उपखोर्‍यात पावसाची चांगली हजेरी लागली आहे. मागील पाच वर्षात उजनी धरण नेहमीच 15 जुलै ते 5 ऑगस्टच्या दरम्यान उपयुक्त पातळीत येते आणि यानंतर झपाट्याने ते क्षमतेने भरते. मागील दोन वर्षात या धरणावर उशिरापर्यंत पाऊस पडला आहे. मागील वर्षी तर पूरस्थिती होती. याचबरोबर धरणावर ही एकूण 1 हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस कोसळला होता.

*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 22/07/2021 at 18:00 hrs
RWL —— 491.035 m.
*-Storage-*
Gross ——- 1803.81 M Cum.
——– (63.69 TMC)
Live ——– 1.00 M Cum.
——— ( 0.04 TMC)
Live % ——– *0.07 %*
*Inflow :-*
1) River Gauge at Daund :-
River Water Level — 499.260 m.
Inflow ————- 15385 Cusecs.
2) Pune Bundgarden
@ 18:00 hrs today.
River water level – 540.600 m.
Inflow —— 27647 Cusecs.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!