पंढरपूरमध्ये भीमा 12 हजार क्युसेकने वाहतेय, सकाळी वीरचा विसर्ग 22 हजार क्युसेक..

पंढरपूर-नीरा खोरे परिसरात झालेल्या पावसाने तेथील धरणं भरली आहेत. यामुळे वीर प्रकल्पातून आजही 22 क्युसेक वेगाने पाणी सोडले जात आहे. यामुळे नीरा व भीमा या दोन्ही नद्या भरून वाहत आहेत. पंढरपूरची भीमा नदीची पाणी पातळी वाढत असून 22 आँगस्ट रोजी सकाळी आठ वाजता 12 हजार क्युसेक इतकी होती. यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दोन दिवसांपासून वीर मधून पाणी सोडले जात आहे. भाटघर व वीर शंभर टक्के भरले आहे तर देवघर धरणात 95 टक्के पाणीसाठा आहे. पाण्याची आवक व पावसाची परिस्थिती पाहून वीर धरणातून पाणी कमी जास्त केले जाते. मागील आठवड्यात ही धरणातून मोठे विसर्ग सोडण्यात आले होते. यामुळे नीरा व संगमच्या पुढे भीमा दुथडी भरून वाहत होती. सध्या वीरचे 5 दरवाजे उघडून यातून 640 क्युमेक्स म्हणजे 22 हजार क्युसेक पाणी सोडले जात आहे.

1,315 thoughts on “पंढरपूरमध्ये भीमा 12 हजार क्युसेकने वाहतेय, सकाळी वीरचा विसर्ग 22 हजार क्युसेक..