पंढरपूर तालुका ग्रामपंचायत निवडणूक ;आठ टेबलवर नऊ फेऱ्यात होणार मतमोजणी

पंढरपूर, दि. 17:- पंढरपूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतीसाठी 331 मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले असून.मतमोजणी सोमवार दि 18 जानेवारी 2021 रोजी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे सकाळी 8.00 वाजता होणार आहे. मतमोजणी 219 अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 8 टेबलवर 9 फेऱ्यात मतमोजणी होणार आहे. याबाबत प्रशासनाने पूर्ण तयारी केली असल्याची माहिती प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार विवेक सांळुखे यांनी दिली.

ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2020-21 साठी तालुक्यात 71 ग्रामपंचायतीसाठी 84.87 टक्के मतदान झाले असून, 89 हजार 756 पुरुष मतदार तर 76 हजार 956 स्त्री मतदार असे एकूण एक लाख 66 हजार 712 मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. मतमोजणीसाठी 8 टेबलवर 9 फेऱ्यात गांवनिहाय मतमोजणी केली जाणार आहे. मतमोजणी प्रत्येक फेरीस 30 ते 40 मिनिट लागणाची शक्यता असून, कासेगांव आणि करकंब ग्रामपंचायत मोठी असल्याने मतमोजणी सर्वात शेवटी करण्यात येणार आहे. मतदान केंद्रावर मतमोजणी प्रत्यक्ष निवडणूक निर्णय अधिकारी व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या प्रत्यक्ष पाहणीत होणार आहे. मतमोजणीसाठी संबधित अधिकारी कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले असून, यामध्ये मतमोजणी मशीन कसे सुरु करावे, सील कसे उघडावे, मतदान नोंदी कश्या घ्याव्यात याबाबत प्रशिक्षण देण्यात आले आहे.

मतमोजणी वेळी शासकीय धान्य गोदाम, पंढरपूर येथे नागरिकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने पोलीस प्रशासनाच्या वतीने कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ग्रामपंचायत निहाय निकाल ध्वनीक्षेपकावरुन जाहीर करण्यात येणार आहे.तसेच ज्या ग्रामपंचायतीची मतमोजणी असेल अशाच प्रतिनिधींना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार असल्याचेही प्राधिकृत अधिकारी तथा तहसिलदार सांळुखे यांनी यावेळी सांगितले.


WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!