पंढरपूर: दहावीचा निकाल 97.56 %; सावनी दोशी 100 टक्के गुणासह राज्यात प्रथम, 38 शाळांचा निकाल 100 %


पंढरपूर, – शहर आणि तालुक्याचा दहावीचा निकाल 97.56 टक्के लागला असून 38 शाळा या शंभर टक्के निकालाच्या आहेत. तालुक्यातून 7 हजार 64 विद्यार्थ्यानी दहावीची परीक्षा दिली होती. यापैकी 6 हाजर 892 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यात 2 हजार 776 विद्यार्थी हे 75 टक्केहून अधिक गुण मिळवून यशस्वी झाले आहेत. येथील कवठेकर प्रशालेची सावनी तारकेश्‍वर दोशी या विद्यार्थीनीला क्रीडागुणांसह 100 टक्के गुण प्राप्त केले आहेत. ही विद्यार्थीनी राज्यात प्रथम आली आहे.
दहावीचा निकाल बुधवारी दुपारी दोन वाजता जाहीर झाला. यामध्ये पंढरपूर शहर आणि तालुक्यातील 103 शाळांचा निकाल आज लागला आहे. शहरातील कवठेकर प्रशालेतील विद्यार्थीनी सावनी तारकेश्‍वर दोशी या विद्यार्थीनीला 100 टक्के गुण प्राप्त झाले आहेत. सदरच्या विद्यार्थ्यानीस क्रीडा विषयांचे दहा गुण अधिक मिळाले. त्यामुळे या विद्यार्थीनीचे एकंदर गुणांकन हे 100 टक्के झाले. आणि ही राज्यात सर्वपथम आली आहे. तर कवठेकर प्रशालेचा निकाल हा 96.66 टक्के इतका लागता.
येथील द.ह.कवठेकर प्रशालेची विद्यार्थीनी साक्षी सुहास कुलकर्णी हिने 99.60% गुण प्राप्त करुन प्रशालेत प्रथम क्रमांक मिळविला. प्रशालेचा निकाल 99.30 टक्के लागला. येथील साक्षी सुहास कुलकर्णी 99.60 टक्के प्रथम, श्रावणी पत्की 99.20 टक्के व्दितीय, अपूर्वा जाधव 98.60 टक्के तृतीय क्रमांक मिळविला आहे. 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळविणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या 70 आहे. उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुधाकरपंत परिचारक, अध्यक्ष वा. ना. उत्पात यांनी केले आहे.
दहावी परीक्षेचा शाळानिहाय निकालः आपटे उपलप प्रशाला पंढरपूर 96.42, कवठेकर हायस्कूल 96.66, लोकमान्य विद्यालय 93.22, रमाबाई जोशी हायस्कूल करकंब 99.11, यशवंत विद्यालय भोसे 99.24, गौतम विद्यालय पंढरपूर 95.55, विवेक वर्धिनी पंढरपूर 97.45, मातोश्री सखुबाई कन्या प्रशाला पंढरपूर 97.77, न्यू इंग्लिश स्कूल भाळवणी 99.06, द.ह.कवठेकर प्रशाला 99.30, न्यू इंग्लिश स्कूल गादेगाव 97.70, एसएमएस स्कूल आंबेचिंचोली 100, अँग्लो उर्दू हायस्कूल 50, लिंगेश्‍वर विद्यालय पुळूज 98.03, न्यू इंग्लिश स्कूल रोपळे बु 100, यशवंत विद्यालय पंढरपूर 100, दौलतराव विद्यालय कासेगाव 95.78, साधना विद्यालय तावशी 100, सीताराम महाराज विद्यालय खर्डी 96.70, श्री तुंगेश्‍वर हायस्कूल तुंगत 98.03, जवाहरलाल नेहरू विद्यालय सिध्देवाडी 100, श्री दत्त विद्यामंदिर सुस्ते 99.19, आचार्य दोंदे विद्यालय ओझेवाडी 100, सद्गुरू गाडगेमहाराज विद्यामंदिर पंढरपूर 90.47, श्रीनाथ विद्यालय भंडीशेगाव 100, मोहसीन विद्यालय वाखरी 96.15, श्री विठ्ठल प्रशाला वेणूनगर 97.29, श्रीनाथ विद्यालय सोनके 100, श्री भैरवनाथ विद्यालय सरकोली 89.47, अण्णासाहेब पाटील विद्यामंदिर तिसंगी 99.23.
इंग्लिश स्कूल पंढरपूर 100, न्यू इंग्लिश स्कूल करकंब 100, विद्यामंदिर बार्डी 90, नूतन विद्यालय कोर्टी 96.07, शेळवे कृषी विद्यालय 93.12, संतप्रभू प्रशाला अजनसोंड 100, कै. आण्णाभाऊ साठे प्रशाला 93.42, माध्यमिक आश्रमशाळा वाखरी 97.67, पटवर्धनकुरोली प्रशाला 100, कर्मवीर औदुंबरराव पाटील विद्यालय पंढरपूर 97.72, वसंतराव काळे प्रशाला वाडीकुरोली 98.62, श्री दर्लिंग विद्यामंदिर चळे 96.20, विलासराव देशमुख हायस्कूल उपरी 94.11, वामनराव माने प्रशाला भैरवनाथवाडी 97.19, विद्याविकास मंदिर उंबरे (पागे) 94.80, मातोश्री ईश्‍वरम्मा विद्यालय गणेशनगर 94.80, न्यू इंग्लिश स्कूल अनवली 98.11, राजीव गांधी विद्यालय फुलचिंचोली 98.21, श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय मंंढेवाडी 100, गोपाळकृष्ण विद्यालय 86.11, जिजामाता प्रशाला आंबे 97.56, श्रीमंतराव काळे विद्यालय जैनवाडी 100, भैरवनाथ विद्यालय आढीव 100, ज्ञानेश्‍वर माउली विद्यालय खरसोळी 100, श्री दर्लिंग विद्यामंदिर मगरवाडी 100, श्री भैरवाथ विद्यामंदिर कान्हापूरी 96.87, आदर्श कन्या प्रशाला करकंब 100, सिध्देश्‍वर प्रशाला तपकिरी शेटफळ 97.36, विद्यानंद विद्यालय बार्डी 100, श्री दुधेश्‍वर प्रशाला मेंढापूर 100, डॉ. पतंगरावजी कदम विद्यालय पळशी 97.36, श्री गगनगिरी विद्यालय सांगवी 93.47, रेणूका विद्यालय बाभुळगाव 97.14, विद्याविकास प्रशाला लक्ष्मी टाकळी 97.56, मा.रूक्मिणी गंगाराम होळकर विद्यालय व्होळे 96.92, डॉ. फाळके प्रशाला पांढरेवाडी 100, हनुमान विद्यालय सुपली 98, मातोश्री सरूबाई माने विद्यालय भटुंबरे 100, राजाराम हायस्कूल पंढरपूर 100, रांझणी विद्यामंदिर 97.05, खेडभोसे विद्यालय 97.50, यशकीर्ती विद्यालय बुरूडगल्ली 97.43, श्री सिध्दनाथ विद्यालय कासेगाव 97.43, माध्यमिक विद्यालय कौठाळी 97.05, कर्मयोगी तारापूर 83.33, पेहे विद्यालय 100, अहिल्या प्रशाला केसकरवाडी 99.07, शिरगाव विद्यालय 100, छत्रपती शिवाजी महाराज हायस्कूल स्टेशन रोड पंढरपूर 97.50, कर्मयोगी सु.परिचारक विद्यालय पुळूज 100, रत्नमहर्षी विद्यालय शिरसोडी 96.15, प्रोगे्रस पंढरपूर 97.39, मॉडर्न पिराची कुरोली 100, बाबूराव जाधव विद्यालय 96.04, मा. सुधाकरपंत परिचारक प्रशाला करकंब 100, मा. रत्नप्रभादेवी मोहिते पाटील विद्यालय मनिषानगर 97.05, राहुल गांधी विद्यालय कोर्टी 100, माध्यमिक विद्यालय नांदोरे 100, न्यू इंग्लिश स्कूल शेवते 93.61, ज्ञानप्रबोधिनी पंढरपूर 97.67, प्रमिला देशमुख विद्यालय 100, स्व.धीरूभाई अंबानी विद्यालय शेगावदुमाला 92.72, राजनंदिनी विद्यालय कौठाळी 93.10, माध्यमिक विद्यालय नेपतगाव 100, बोहाळी महाविद्यालय 97.22, प्रागे्रस कोर्टी 100, पालवी विद्यालय 80, आदर्श शाळा 100 टक्के.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!