पंढरीतील प्रदक्षिणा मार्गावरील काळा मारुती ते छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर सील

पंढरपूर – शहरातील प्रदक्षिणा मार्गावर बेलीचा महादेव परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने येथील काळा मारूती ते छत्रपती संभाजी महाराज चौक परिसर प्रशासनाने सील केला आहे.

स्वँब अहवाल प्राप्त झाल्यानंतर या व्यक्तीस सकाळी त्याच्या निवासस्थानातून कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. याच बरोबर त्यांच्या संपर्कातील लोंकाची माहिती प्रशासन गोळा करत आहे. सकाळी या भागाला मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ बोधले यांनी भेट दिली.

आज सापडलेला कोरोनाबाधित रूग्ण हा शिक्षक, बँकेचा संचालक असल्याने त्यांच्या संपर्कात अनेकजण आले असण्याची शक्यता आहे.

फोटो : पंढरपूरमध्ये ज्या भागात कोरोनाबाधित आढळला तेथील पाहणी करताना मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व अन्य अधिकारी.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!