पूरस्थिती पाहता पंढरपूरमध्ये नदीकाठच्या वसाहतीमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले
पंढरपूर – उजनी ,वीर धरणातून सोडण्यात येत असलेले पाणी व भीमाकाठी होत असलेल्या पावसामुळे येत्या काही तासांमध्ये पंढरपूरमध्ये नदीला पूरस्थिती असणार आहे. हे पाहता नदीकाठच्या वसाहतीमधील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. प्रांताधिकारी सचिन ढोले व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर हे स्वतः नदीकाठी वसाहतीमधील नागरिकांशी चर्चा करत होते.
नगरपरिषदेने पूररेषेतील वसाहतीमधील नागरिकांना राहण्यासाठी तनपुरे महाराज मठ, केंद्रे महाराज मठ व लोकमान्य विद्यालय येथे सोय केली आहे.
व्यासनारायण झोपडपट्टी, डॉ. आंबेडकर नगर, लखुबाई मंदिर परिसर, आंबाबाई पटांगण येथील नागरिकांना सुरक्षितस्थळी पाठविले जात आहे. उजनी, वीर व पावसाच्या पाण्यामुळे भीमेचा विसर्ग अडीच लाख क्युसेकहून अधिक असणार आहे.
Howdy! I could have sworn I’ve been to this blog before but after browsing through some of the post I realized it’s new to me. Nonetheless, I’m definitely happy I found it and I’ll be bookmarking and checking back often!