पवारसाहेबांनी सहकार शिरोमणी व विठ्ठल कारखान्याला सहकार्य केले : कल्याणराव काळे

पंढरपूर – दुष्काळी परिस्थितीमुळे बँकांच्या व्याजाचा डोलारा व हप्ते याकरीता बँक कर्जासाठी वेळोवेळी माजी कृषीमंत्री शरद पवार यांची भेट घेतली व त्यांनी सहकार शिरोमणी व विठ्ठल कारखान्यास सहकार्य केल्याचे सहकार शिरोमणी साखर काखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे यांनी सांगितले.

खर्डी येथील सिताराम महाराज साखर कारखान्याच्या 8 व्या बॉयलर अग्निप्रदीपन व गळीत हंगामाचा शुभारंभ संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन प्रा. शिवाजी काळुंगे व त्यांच्या श पत्नी सौ. शोभाताई काळुंगे यांच्या हस्ते गव्हाण पूजन करून करण्यात आला. यावेळी काळे बोलत होते.

प्रारंभी कारखान्याचे कर्मचारी सुनील रोंगे व त्यांच्या पत्नी तसेच कामगार प्रशांत राजाराम बुरांडे, देविदास वाघमारे, रामेश्‍वर पवार व बाळासाहेब जाधव यांच्या हस्ते बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा व कारखान्याचे काटा पुजनाचा कार्यक‘म कर्मचारी आण्णासाहेब नवनाथ थिटे व त्यांच्या पत्नी सीमा आण्णासाहेब थिटे या उभयतांचे शुभहस्ते करण्यात आला.

प्रास्ताविकात बोलताना कारखान्याचे कार्यकारी संचालक समाधान काळे म्हणाले की, मागील वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे कारखाना बंद ठेवावा लागला. त्यामुळे कारखान्याचे आर्थिक नियोजन विस्कळीत झाले.परंतु धनश्री परिवाराने सिताराम कारखान्यास आर्थिक मदत करुन कारखाना चालू करणेकामी चालना दिली. कारखान्याचे संचालक महादेव देठे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आर्थिक निधीची उपलब्धता झाल्यानंतर कामगारांनी फक्त 40 दिवसात कारखान्यात मेटनन्सची कांमे पुर्ण केली आहेत. यावेळी सहकार शिरोमणी कारखान्याचे संचालक श्री. सुधाकर कवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये विठ्ठल परिवार हा संघर्षातुन तयार झालेला परिवार असूं यास संघर्षातुन आपले ध्येय गाठणेकांमी वाटचाल करणेचे संपूर्ण ज्ञान असल्याचे सांगितले.

यावेळी शिवाजीराव काळुंगे म्हणाले की, सिताराम महाराज साखर कारखान्याने पुढील 4 महिन्याच्या हंगामात जास्तीतजास्त ऊसाचे गाळप करुन व सहवीज निर्मिती प्रकल्पातुन जास्तीतजास्त वीज एक्सपोर्ट करुन आर्थिक घडी बसविणे आवश्यक आहे.

अध्यक्षपदावरुन बोलताना सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे म्हणाले की, मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे कारखान्यासमोर अनेक आर्थिक प्रश्‍न तयार झाले व त्यातून संयमाने आर्थिक अडचणी सोडवुन शेतक-यांच्या 2018-19 मधील ऊस बिलाच्या एफआरपी पोटी प्र.मे.टन रु. 500/- प्रमाणे रक्कम गटवाईज बँकेत जमा केली असुन कारखान्याचे चिटबॉय मार्फत संबंधित शेतक-यांस कळविणेत आलेले आहे.

सदर कार्यक्रमास यशवंतराव चव्हाण पतसंस्थेचे चेअरमन नारायणदादा मोरे, सिताराम महाराज साखर कारखान्याचे चेअरमन गणेश ठिगळे, कार्यकारी संचालक समाधानदादा काळे, विठठल सह.साखर कारखान्याचे संचालक उत्तम नाईकनवरे, महादेव देठे, सहकार शिरोमणीचे संचालक सुधाकर कवडे, माजी संचालक तुकाराम माने, तानाजी जाधव, भारत भुसे, राजसिंह माने, गंगथडे भाऊ,बिभीषण ताड, सोपान तोडकर, पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश भादुले आदी उपस्थित होते. जनरल मॅनेजर डी.के.शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत केले यावेळी वर्क्स मॅनेजर भिंगारे, टेक्नीकल मॅनेजर शिंदे, शेती अधिकारी आसबे, चिफ अकौटंट शिंदे उपस्थित होते. प्रशासन अधिकारी डी.एम्. सुतार यांनी आभार व्यक्त केले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!