पाच तालुक्यातील 31 गावात संचारबंदी ; जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश जारी

सोलापूर, दि. 15 : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, संसर्ग कमी करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यातील 31 गावात गुरूवार, दि. 16 जुलैच्या रात्री 23.59 वाजलेपासून 26 जुलैच्या रात्री 24.00 पर्यंत दहा दिवस संचारबंदी लागू करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.

उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी, तिऱ्हे, पाकणी, कोंडी, बाणेगाव, नान्नज, तळे हिप्परगा, हगलूर, एकरूख, कारंबा आणि भोगाव, दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी, विडी घरकुल, वळसंग, मुळेगाव, मुळेगाव तांडा, बोरामणी, होटगी, लिंबी चिंचोळी, बक्षी हिप्परगा, कासेगाव, उळेगाव, तांदुळवाडी, अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट शहर, मोहोळ तालुक्यातील मोहोळ शहर, कुरूल, कामती खुर्द, कामती बुद्रुक आणि बार्शी तालुक्यातील बार्शी शहर आणि वैराग (बार्शी) या गावात संचारबंदी लागू करण्यात आल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी जारी केलेल्या आदेशानुसार संचारबंदी काळात काय बंद राहणार, सुरू राहणार याबाबतचा तपशील पुढीलप्रमाणे.

काय बंद राहणार

– किराणा दुकाने, सर्व किरकोळ व ठोक विक्रेते, इतर व्यवसाय करणारे व्यापारी दुकाने, सर्व प्रकारचे उद्योग.

– सर्व राज्य शासनाचे/ केंद्र शासनाचे कार्यालये, शासन अंगीकृत उपक्रम व स्थानिक स्वराज्य संस्थेची कार्यालये कोरोना (कोविड-19) शी संबंधित कार्यरत असणारी कार्यालये/उपक्रम वगळून.

-स्वस्त धान्य दुकाने.

-कृषी उत्पन्न बाजार समित्या.

– मॉर्निंग वॉक, बाग, क्रिडांगणे, उद्याने आदी

– उपहारगृहे, लॉज, हॉटेल्स, रिसॉर्ट, मॉल, बाजार. तथापि उपहारगृहातून फक्त घरपोच सेवा सुरू. लॉजिंगचे नवीन बुकिंग या आदेशानंतर बंद.

– केश कर्तनालये/सलून, स्पा/ब्यूटी पार्लर.

– किरकोळ व ठोक विक्रीची ठिकाणे आडत, भाजी मार्केट, फळ विक्रेते, आठवडी व दैनिक बाजार.

-मटण, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने

– शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण संस्था, शिकवणी वर्ग.

– दुचाकी, तीन चाकी, चार चाकी वाहतूक बंद. (फक्त पासधारकांनाच परवानगी)

– बांधकामे (ज्या ठिकाणी कामगारांच्या निवासाची व्यवस्था आहे, तेथे काम सुरू ठेवता येणार)

– चित्रपटगृहे, व्यायामशाळा, जलतरण तलाव, करमणूक उद्याने, नाट्यगृह, बार, प्रेक्षागृह, सभागृह.

– मंगल कार्यालये, हॉल, लग्न समारंभ, स्वागत समारंभ आदी

-खाजगी आस्थापना.

-सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम व सभा.

-धार्मिक स्थळे, प्रार्थना स्थळे.

-राष्ट्रीयकृत आणि आरबीआयने मान्यता दिलेल्या बँका, सहकारी बँका यांचे अंतर्गत व्यवहार सुरू राहतील. मात्र नागरिकांसाठी बँकेचे व्यवहार बंद. बँकेची ऑनलाईन, एटीएम व एटीएमशी निगडीत सेवा सुरू.

काय सुरू राहणार

-कारखाने, उद्योगधंदे सुरू राहतील. मात्र कारखान्यांनी कामगार व कर्मचाऱ्यांची ने-आण स्वतंत्र वाहनांनी करावी.

-घरपोच दूध वितरणासाठी सकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत परवानगी. एका ठिकाणी उभे राहून दूध विक्री करता येणार नाही.

-खाजगी, सार्वजनिक वैद्यकीय सेवा, पशुचिकित्सा सेवा नियमित वेळेनुसार.

-रूग्णालये व रूग्णालयांशी निगडीत सेवा नियमित वेळेनुसार. लॉकडाऊनचा आधार घेऊन रूग्णांना सेवा नाकारता येणार नाही.

-मेडिकल, चष्म्याची दुकाने नियमित वेळेनुसार. औषधांची ऑनलाईन वितरण सेवा चालू.

– वैद्यकीय व्यावसायिक, परिचारिका, पॅरामेडिकल, सफाई कर्मचारी व ॲम्ब्युलन्स यांना वाहतुकीसाठी परवानगी.

-पोस्ट कार्यालय

– वैद्यकीय, अत्यावश्यक सेवेतील शासकीय कर्मचारी व त्यांची वाहने आणि कृषीशी निगडीत वाहनांना पेट्रोल पंप सकाळी 8 ते दुपारी 2 पर्यंत चालू.

-घरपोच गॅस वितरण (कंपनीचा गणवेश परिधान करावा अथवा ओळखपत्र सोबत)

-कृषी व कृषीविषयक उपक्रम चालू. बी-बियाणे, खते, किटकनाशके, औषधे, चारा दुकाने सुरू. या आस्थापनाची वेळ सकाळी 8 ते दुपारी 2 वाजेपर्यंत.

-शेतमालाशी/कृषी व्यवसायाशी निगडीत प्रक्रिया उद्योग चालू.

-निर्यात होणाऱ्या वस्तूंची वाहतूक नियमानुसार.

-वर्तमानपत्र प्रिटींग व वितरण, डिजीटल/प्रिंट मीडिया कार्यालये नियमानुसार. पत्रकारांना ओळखपत्र सोबत ठेवणे बंधनकारक.

-पाणीपुरवठा करणारे टँकर.

-औषध आणि अन्न उत्पादन, सलग प्रक्रिया, निर्यात उद्योग व त्यांचे पुरवठादार. (एमआयडीसी पोर्टलवरून यापूर्वी देण्यात आलेली परवानगी ग्राह्य)

-अंत्ययात्रा व अंत्यविधी पूर्वी दिलेल्या अटी व शर्तीनुसार.

– न्यायालयाचे नियमित कामकाज उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सुरू.

कोणाला घराबाहेर पडता येणार

– न्यायालयाचे न्यायाधीश, अधिकारी, कर्मचारी, डॉक्‍टर, नर्स, कर्तव्यावर असणारे केंद्र आणि राज्य शासनाचे कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, दूध विक्रेते, वृत्तपत्र विक्रेते, गॅस वितरक, अंगणवाडी सेविका, मेडिकल दुकानचे कर्मचारी, बी- बियाणे विक्री करणारे, महावितरण, स्वच्छता कर्मचारी, पाणी पुरवठा करणारे कामगार (पोलीस पाससह).

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर कलम 188 आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे, त्याचबरोबर प्रतिबंधित सांसर्गिक क्षेत्रामध्ये (कंटेन्मेट झोन) यापूर्वी देण्यात आलेले आरोग्यविषयक आदेश लागू राहतील.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!