पोटनिवडणुकीच्या तयारीला वेग, प्रशासन व राजकीय पदाधिकाऱ्यांची आज बैठक ; निवडणूक तारखेकडे मतदारसंघाचे लक्ष


पंढरपूर – आमदार कै.भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. याची दखल घेवून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्र, सहाय्यक मतदान केंद्रे, मतदार नाव नोंदणी, बी.एल. ए. नियुक्ती याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पदाधिकारी यांची बैठक आज सोमवार 15 मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे सायंकाळी 5 वा. आयोजित करण्यात आली असल्याची माहिती प्रांताधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

252-पंढरपूर विधानसभा मतदार संघाचे आमदार भारत तुकाराम भालके यांचे निधन झाल्याने रिक्त झालेल्या जागेकरीता पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या ही 1 हजारपेक्षा जास्त आहे. अशा मतदान केंद्राच्या ठिकाणी सहाय्यक मतदानकेंद्राची उभारणी करणे, मतदान केंद्राच्या नावात बदल, पूर्वीच्या मतदान केंद्राची इमारत मोडकळीस आल्याने मूळ मतदान केंद्राच्या ठिकाणी नवीन इमारत प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर सहाय्यकारी मतदानकेंद्राच्या ठिकाणी झालेला बदल, नावात झालेला बदल, रेसिड्यूयल व्होटर (छायाचित्र नसलेले मतदार), नवीन मतदार नोंदणी व बी.एल. ए. नियुक्ती याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. तरी या बैठकीस पंढरपूर -मंगळवेढा तालूक्यातील राजकीय पदाधिकारी यांनी उपस्थित रहावे असे आवाहन उपविभागीय अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

दरम्यान निवडणुकीच्या तारखेबाबत मतदारांमध्ये खूप उत्सुकता आहे. लवकरच निवडणूक आयोग निवडणूक कार्यक्रम जाहीर करणार आहे. दरम्यान प्रशासकीय पातळीवर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक पार पाडण्यासाठी तयारी केली जात आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!