बुधवारी सोलापूर ग्रामीणमध्ये 415 रूग्ण वाढले, सर्वाधिक माळशिरस तालुक्यात 116 ची नोंद

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) बुधवारी 16 सप्टेंबर रोजी एकूण 415 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 116 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 234 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 14 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 18748 इतकी झाली असून यापैकी 11838 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6379 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 234 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 531 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 14जण मयत आहेत.

पंढरपूर तालुका 72 कोरोना रुग्ण वाढले

पंढरपूर – बुधवारी 16 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 36 व तालुक्यात 36 असे 72 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 866 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 90 आहे.एकूण 1091 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 2685 जण कोरोना मधून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!