भाजयुमोच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, ३२४ जणांचा सहभाग

सोलापूर- शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने सामाजिक जागरुकता व सामाजिक बांधिलकी म्हणून सोलापुरात शिवस्मारक संकुल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. यात ३२४ जणांनी सहभाग नोंदविला.
त्या शिबिरास शहरभरातून जागरूक नागरिकांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत ३२४ जणांचे रक्तदान झाले. प्रत्येक रक्तदात्यास आयोजकांकडून रेनकोट भेट देण्यात आला. व कोव्हिड-१९ योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
या शिबिरास दिवसभरात खासदार जयसिद्धेश्वर महाराज, आमदार सुभाष देशमुख, व शहर अध्यक्ष विक्रम देशमुख,मनिष देशमुख,अनंत जाधव, मल्लिनाथ याळगी,शंकर बंडगर महापालिका परिवहन सभापती जय साळुंखे,नगरसेवक अमित पाटील,संजय साळुंखे,अमर बिराजदार,नागेश खरात,हेमंत पिंगळे,सतीश कुदळे,सुधाकर नराल यांनी भेट दिली.
हे रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी समर्थ बंडे, अक्षय अंजिखाने, यतिराज होनमाने,सागर आतनुरे,संदीप जाधव, महेश जेऊर, विनोद गडगी, किरण जाधव, विनोद मोटे,केदार पुजारी, सागर सुरवसे,महेश पाटील,शुभम कुदळे,संदीप कुलकर्णी, शुभम राजमाने,महेश वाघमारे यांनी परिश्रम घेतले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!