भारतनानांचा मुलगा पवार साहेबांच्या आशिर्वादाने मतदारसंघाचा आधुनिक भगीरथ ठरेल : जयंत पाटील

मंगळवेढा – सत्ता गेल्यामुळे भाजपच्या लोकांना वेड लागले आहे. पाण्याविना मासा तडफडतो तशी त्यांची परिस्थिती झाली आहे. या लोकांकडे दुर्लक्ष करून भगीरथ भालके यांना विजयी करा, भारतनानांचा हा मुलगा शरद पवार यांच्या आशिर्वादाने या मतदारसंघासाठी आधुनिक भगीरथ ठरेल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला.
भगीरथ भालके यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भर पावसात सभा झाली.
मंगळवेढ्याला जास्तीतजास्त पाणी मिळावे यासाठी भारतनाना भालके २००९ पासून पाठपुरावा करत होते. भाजप सरकारच्या काळात या मतदारसंघाचे पाणी गायब केले गेले. आपले सरकार आले त्यावेळी मला मंत्री केले नाही तरी चालेल पण माझ्या मतदारसंघाला पाणी द्या, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.
योगायोगाने जलसंपदा मंत्री झाल्यावर आणि आचारसंहिता लागण्याआधीच आपल्या तालुक्याला दोन टीएमसी पाणी देण्याचा निर्णय घेतला. इथल्या खासदारांनी गाव दत्तक घेतले मात्र ते कधीच फिरकले नाहीत. परंतु भगीरथ भालके यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील २४ गावांना सुजलाम सुफलाम करण्याचा मानस असल्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितले.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!