भारतीय निवडणूक आयोगात संतोष अजमेरा यांची नियुक्ती

पुणे, दि. १९ : भारतीय सूचना सेवेतील वरिष्ठ अधिकारी संतोष अजमेरा यांची भारतीय निवडणूक आयोगात संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. श्री. अजमेरा सध्या भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत काम करणार्‍या प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो, महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रमुख म्हणून काम पाहत होते.

श्री. अजमेरा यांनी नवीन माध्यमांचा उपयोग करत, अनेक नवीन संकल्पना राबविल्या. त्यांनी स्वच्छता अभियान, जलशक्ती अभियान, आत्मनिर्भर भारत, डिजिटल इंडिया, आंतरराष्ट्रीय योग दिन, कोरोना जागृती, कोरोना लसीकरण आदी विषयांना लक्षवेधी बनविले. ‘सामाजिक वर्तणूक बदल घडवून आणण्यात मोठा हातभार लावला.

त्यांनी नवी दिल्ली येथे 2013च्या सुमारास ‘न्यू मीडिया विंग’ची स्थापना करण्याची जबाबदारी पार पाडली आहे. याअंतर्गत ‘Talkathon’ सारखा अनोखा कार्यक्रम राबवले गेले. त्यानंतर पुणे स्थित राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (NFAI) येथे ‘राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमे’साठी (National Film Heritage Mission) विशेष अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. राष्ट्रीय चित्रपट वारसा मोहिमेसह प्रादेशिक लोकसंपर्क ब्यूरो (महाराष्ट्र व गोवा राज्य)चा कार्यभार एकाचवेळी ते सांभाळत होते. या सर्व विभागातील त्यांच्या कामाची दखल घेऊन भारतीय निवडणूक आयोग, नवी दिल्ली येथे अजमेरा यांची नेमणूक करण्यात आली आहे.

श्री. अजमेरा बॅडमिंटन खेळाडू असून लेखक देखील आहेत. त्यांनी लिहिलेल्या सात पुस्तकांचे प्रकाशन झाले आहे. त्यांचे ‘Ethics, Integrity and Aptitude’ पुस्तक अमेरिका स्थित MC Graw Hill Publication यांनी प्रकाशित केले आहे. ते सध्या महात्मा गांधी यांच्या जीवनाचा अभ्यास करत आहेत. याकरिता आयुष मंत्रालय, भारत सरकारची शिष्यवृत्ती त्यांना मिळाली आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!