मंगळवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 298 रूग्ण वाढले तर 297 जण झाले कोरोनामुक्त
सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी एकूण 298 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 93 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 297 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 3 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 24672 इतकी झाली असून यापैकी 17608 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 6385 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 297 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 669 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 3जण मयत आहेत.
पंढरपूर तालुक्यात 33 रूग्ण वाढले
पंढरपूर – मंगळवारी 29 सप्टेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 14 व तालुक्यात 19 असे 33 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4 हजार 782 झाली आहे. . आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 115 झाली आहे.एकूण 730 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 3937 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .
I’d perpetually want to be update on new content on this site, saved to favorites! .
I was reading some of your content on this site and I conceive this web site is really instructive! Continue posting.
Appreciate it for all your efforts that you have put in this. very interesting info .
I really appreciate this post. I’ve been looking everywhere for this! Thank goodness I found it on Bing. You’ve made my day! Thank you again