मंगळवारी सोलापूर शहरात 60 तर ग्रामीणमध्ये 285 रूग्ण आढळले

सोलापूर– शहरात 11 ऑगस्टच्या अहवालानुसार नवे 60 रूग्ण आढळून आले आहेत. सोलापूर शहराची एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 520 इतकी झाली आहे. तर सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात आज नवे 285 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण कोरोनाबाधितांची संख्या 6187 झाली आहे.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे सोलापूर शहरातील रुग्ण संख्या कमी होत आहे. मात्र सध्या ग्रामीण भागात विविध तालुक्यात चाचण्या वाढल्याने तेथील कोरोनाबाधितांची संख्या शहरापेक्षा जास्त झाली आहे.

सोलापूर महापालिकाक्षेत्रात आजवर 5 हजार 520 रूग्ण आढळले असून 968 जणांवर उपचार सुरु आहेत. 4169 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. 383 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. आज 104 जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी एकूण 690 अहवाल मिळाले असून यापैकी 630 निगेटिव्ह आहे तर 60 पॉझिटिव्ह आहेत.

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागात (महानगरपालिकाक्षेत्र वगळून) आज 285 कोरोना बाधित वाढले आहेत. एकूण बाधितांची संख्या 6187 असून 3561 जण उपचारानंतर घरी गेले आहेत तर 2447 जण अद्याप उपचार घेत आहेत.179 जणांना आज घरी पाठविण्यात आले आहे. ग्रामीण भागात कोरोनामुळे 179 जण मरण पावले आहेत.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!