महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठी पेरा सीईटी 2020 परीक्षा 31 जुलैपासून ऑनलाइन

पुणे, ता.20 :- राज्यातील काही खासगी विद्यापीठांनी एकत्र येत विद्यापीठाच्या कायद्यानुसार पेरा (प्रिमीयंट एज्युकेशन अँड रिसर्च असोसिएशन) या संस्थेची स्थापना केली असून अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि उपाध्यक्ष श्री. भारत अग्रवाल म्हणून काम पाहात आहे. या संस्थेच्या माध्यमातून खासगी विद्यापीठांतील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी ऑनलाइन पेरा सीईटी – 2020 परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा 31 जुलै रोजी सुरू होणार असून 2 ऑगस्ट 2020 रोजी संपणार आहे. निकाल 5 ऑगस्ट रोजी जाहीर केले जाईल, अशी माहिती पेराचे अध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड आणि पेराचे उपाध्यक्ष श्री. भारत अग्रवाल यांनी दिली.

प्रा. डॉ. मंगेश कराड म्हणाले, महाराष्ट्र शासनाने 19 खासगी विद्यापीठांना मान्यता दिली असून ती आज राज्यभर कार्यरत आहेत. खासगी विद्यापीठांच्या कायद्यानुसार सरकारी एजन्सीद्वारे घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षा व्यतिरिक्त खासगी विद्यापीठांच्या संघटनेने घेतलेल्या सीईटीच्या आधारे विद्यार्थ्यांना विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेता येतो. यावर्षी कोरोना रोगाच्या प्रादुर्भावामुळे एमएच-सीईटी कधी होईल याची शाश्वती नाही. जेईई सीईटी परीक्षा 6 सप्टेंबर 2020 रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे खासगी विद्यापीठातील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेला गती देण्यासाठी पेरा या खासगी विद्यापीठाच्या संघटनांनी 31 जुलै, 1 आणि 2 ऑगस्ट 2020 रोजी ऑनलाईन परीक्षा पद्धतीद्वारा सीईटी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सीईटीच्या आधारे विद्यार्थी राज्यातील खासगी विद्यापीठांमध्ये प्रवेश अर्ज करून शकतात. तसेच आपला प्रवेश निश्चित करू शकतात.

पेरा सीईटी परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येईल. या सीईटी परीक्षेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी 28 जुलै ही अंतिम तारीख आहे. विद्यार्थ्यांना या सीईटीची ऑनलाइन परीक्षा पद्धत समजून घेण्यासाठी 26 व 27 जुलै रोजी मॉक परीक्षा घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना घरातूनच ही सीईटी परीक्षा देता येणार आहे. अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी www.peraindia.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी, असे ही प्रा. डॉ. मंगेश कराड यांनी सांगितले.

7 thoughts on “महाराष्ट्रातील खासगी विद्यापीठांच्या प्रवेशांसाठी पेरा सीईटी 2020 परीक्षा 31 जुलैपासून ऑनलाइन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!