महाराष्ट्र राज्य विकास कर्ज २०३० अंतर्गत १००० कोटी रुपयांच्या रोख्यांची विक्री
मुंबई दि. 8 : महाराष्ट्र शासनच्या अधिसूचनेद्वारे शासनाच्या 10 वर्ष मुदतीच्या एकूण रुपये 1000 कोटींच्या रोखे विक्रीची सूचना दिली आहे. राज्य शासनास रुपये 500 कोटीपर्यंत अतिरिक्त रक्कम उभारण्याचा पर्याय उपलब्ध असेल. विक्री शासनाच्या विनिर्दिष्ट अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या अटी व शर्तीच्या अधीन राहील. तसेच राज्य शासनाच्या क्र. एलएनएफ. 10.19/ प्र.क्र. 10/ अर्थोपाय, दिनांक 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचनेमध्ये नमूद केलेल्या व वेळोवेळी सुधारित केलेल्या शर्ती व अटींचे अधीन राहील.
कर्जाचा उद्देश, कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग महाराष्ट्र सरकारच्या विकास कार्यक्रम संबंधिच्या खर्चासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी करण्यात येईल. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 293 (3) अन्वये कर्ज उभारणीस केंद्र शासनाची अनुमती घेण्यात आली आहे. कार्यप्रणाली : – शासकीय रोख्यांची विक्री भारतीय रिझर्व्ह बँक, फोर्ट, मुंबई 400 001 द्वारे दिनांक 16 मे, 2019 च्या सुधारित सर्वसाधारण अधिसूचना क्र. एलएनएफ. 10.19/ प्र.क्र.10/अर्थोपाय, परिच्छेद 6.1 मध्ये निर्देशित केलेल्या कार्यप्रणालीनुसार लिलावाने करण्यात येईल.
अस्पर्धात्मक बिडर्सला प्रदान, राज्यशासनाच्या सर्वसाधारण अधिसूचना क्रमांक एलएनएफ.10.19/ प्र.क्र.10/अर्थोपाय, दिनांक 16, मे, 2019 मधील अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या 10 टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणूकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणूकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त 1 टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल.
लिलावाचा दिनांक व ठिकाण भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे दिनांक 13 ऑक्टोबर, 2020 रोजी त्यांच्या फोर्ट, मुंबई येथील कार्यालयात लिलाव आयोजित करण्यात येईल. लिलावाचे बिडस् दिनांक 13 ऑक्टोबर, 2020 रोजी खालीलप्रमाणे संगणकीय प्रणालीनुसार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन (ई – कुबेर) सिस्टीमनुसार सादर करण्यात यावेत : (अ) स्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन (ई – कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.30 वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत. (ब) अस्पर्धात्मक बिडस् संगणकीय प्रणालीद्वारे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, कोअर बँकींग सोल्यूशन (ई – कुबेर) सिस्टीमनुसार सकाळी 10.30 ते 11.00 वाजेपर्यंत सादर करण्यात यावेत.
लिलावाचा निकाल भारतीय रिझर्व्ह बँक, मुंबईतर्फे त्यांच्या संकेतस्थळावर त्याच दिवशी प्रसिद्ध करण्यात येईल. यशस्वी झालेल्या बिडर्सकडून रकमेचे प्रदान दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 रोजी करण्यात येईल.
अधिदानाची कार्यपद्धती यशस्वी झालेल्या बिडर्सकडून दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 रोजी रिझर्व्ह बैंक ऑफ इंडिया, फोर्ट, मुंबई यांच्या कार्यालयात रोखीने, बँकर्स धनादेश/ प्रदान आदेश, डिमांड ड्राफ्ट किंवा त्यांच्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई येथील खात्यात देय असलेले धनादेश बँकेची कामकाजाची वेळ संपण्यापूर्वी अधिदानाने प्रदान करण्यात येईल.
कर्जरोख्याचा कालावधी – कर्जरोख्याचा कालावधी 10 वर्षांचा असेल. रोख्याचा कालावधी हा दिनांक 14 ऑक्टोबर, 2020 रोजीपासून. सुरू होईल. परतफेडीचा दिनांक. – दिनांक 14 ऑक्टोबर, 2030 रोजी पूर्ण किमतीने कर्जाची परतफेड करण्यात येईल. व्याजाचा दर. -अधिकतम प्राप्तीचा दर हा लिलावात विक्री केलेल्या रोख्यांवरील दरसाल दर शेकडा कूपन दरा एवढा असेल. व्याजाचे प्रदान प्रतिवर्षी दिनांक 14 एप्रिल आणि 14 ऑक्टोबर रोजी सहामाही पद्धतीने करण्यात येईल.
कर्जरोख्याची पात्रता – शासकीय रोख्यांमधील बँकांची गुंतवणूक ही बँकींग विनियम अधिनियम, 1949 खालील कलम 24 अंतर्गत सांविधिक रोकड सुलभता गुणोत्तर (SLR) या प्रयोजनार्थ पात्र समजण्यात येईल. कर्जरोखे हे पुनः विक्री – खरेदीसाठी अनुज्ञेय असतील. असे वित्त विभागाच्या 8 ऑक्टोबर 2020 च्या अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
0000
I was looking for another article by chance and found your article majorsite I am writing on this topic, so I think it will help a lot. I leave my blog address below. Please visit once.