महाविकास आघाडी एकत्रित येते तेव्हा भाजपा पराभूत होतो , पंढरपूरमध्येही राष्ट्रवादीच विजयी होणारः जयंत पाटील


पंढरपूर, – राज्यात सत्तेत असणारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष जेंव्हा एकत्र येतात तेेेंव्हा भारतीय जनता पक्षाचा पूर्णतः पराभव होतो हे विधानपरिषद निवडणुकीत दिसून आले आहे. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत देखील अशीच स्थित होणार असल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांचा विजय निश्‍चित असल्याचा विश्‍वास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केला.

पाटील हे भालके यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पंढरीत आले होते. यावेळी संत तनपुरे महाराज मठात आयोजित पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री दत्तात्रय भरणे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे, पक्षाचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, काँगे्रस कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, शिवसेना जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील पानीवकर यांच्यासह महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्रित आली आणि त्यांनी भाजपाला पराभूत केले आहे. आता ही तशीच स्थिती आहे. येथेही आघाडीच राहावी यासाठी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, काँगे्रस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले तसेच अन्य घटकपक्षांचे नेते यांच्यात एकवाक्यता आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!