‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत लोकसहभाग महत्वाचाः मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर

पंढरपूरसह ग्रामीण भागात आरोग्य तपासणीस सुरूवात
पंढरपूर दि(15):- जिल्ह्यासह शहरी व ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यावर मात करण्यासाठी नागरिकांनी स्वत:ची व स्वत:च्या कुटुंबाच्याआरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच नागरिकांमध्ये आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे असे, आवाहन मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेचा प्रारंभ माळी वस्ती, टाकळी रोड पंढरपूर येथे नगराध्यक्षा साधना भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आरोग्य समिती सभापती विवेक परदेशी, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, नगरसेवक श्री.घोडके, उपमुख्याधिकारी सुनील वाळुंजकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, डॉ.सरवदे, डॉ. बी. के. धोत्रे तसेच आरोग्य पथकाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलतनामानोरकर म्हणाले, या मोहिम कालावधीत गृह भेटी देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली असून घरोघरी जावून कुटुंबांतील प्रत्येक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आहे. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींची आरोग्य विषयक माहिती संकलित करुन आजारी तसेच आजाराची लक्षणे असणाऱ्यांना तत्काळ वैद्यकीय उपचार करण्यात येणार आहेत. यासाठी प्रत्येक वार्डात पथकाव्दारे 50 कुटुंबांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. नागरिकांनी आरोग्य पथकाला आरोग्य विषयक तपासणी व आजारासंबधी माहिती याबाबत सहकार्य करावे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ या मोहिमेत या मोहिमेत कुटंबातील कोणताही नागरिक आरोग्य तपासणी पासूण वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन नगराध्यक्षा साधना भोसले यांनी यावेळी केले.


तुंगत येथून ग्रामीणमधील मोहिमेस प्रारंभ
ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांमध्ये आरोग्याबाबत जबादारीची जाणीव निर्माण व्हावी, आरोग्य साक्षरता निर्माण व्हावी या उद्देशाने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेचा प्रारंभ प्राथमिक आरोग्य केंद्र, तुंगतयेथे करण्यात आला. यावेळी गटविकास अधिकारी रवीकिरण घोडके, सरपंच अंतनराव रणदिवे, सहाय्यक गटविकास अधिकारी पिसे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.एकनाथ बोधले, ग्रामपंचायत सदस्य , आरोग्य अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका,आशा वर्कर उपस्थित होते.या अभियाना अंतर्गत घरोघरी तपासणी करण्यात येणार असल्यामुळे कोरोन बधितांना वेळेत उपचार मिळवून देणे शक्य होईल.

713 thoughts on “‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत लोकसहभाग महत्वाचाः मुख्याधिकारी अनिकेत मनोरकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *