मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासह नऊ जणांनी घेतली विधानपरिषद सदस्यत्वाची शपथ

नुकतीच विधानपरिषदेची नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली होती. यात प्रमुख चार ही पक्षांनी नऊच उमेदवार दिल्याने सर्वजन बिनविरोध झाले आहेत. सोमवार 18 मे रोजी त्यांना सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यात मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम दिवाकर गोर्हे, शशिकांत जयवंतराव शिंदे, रणजितसिंह विजयसिंह मोहिते-पाटील, रमेश काशिराम कराड, प्रवीण प्रभाकरराव दटके, गोपीचंद कुंडलिक पडळकर, अमोल रामकृष्ण मिटकरी, राजेश धोंडीराम राठोड यांचा समावेश होता.
यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे, कृषिमंत्री दादाजी भुसे, परिवहनमंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्मीताई ठाकरे उपस्थित होते.
विधानपरिषदेच्या नऊ जागांपैकी चार जागा भाजपाच्या वाट्याला आल्या तर प्रत्येकी दोन जागा शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाल्या. एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आली होती.
There is apparently a bunch to know about this. I suppose you made some good points in features also.