राष्ट्रवादीच्या शिबिरात जैनवाडीत १२१ जणांनी केले रक्तदान

पंढरपूर – तालुक्यातील जैनवाडी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या २१ व्या वर्धापनदिनानिमित्त तालुकाध्यक्ष ॲड. दीपक दामोदर पवार यांनी रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.यात १२१ रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला.

तसेच यावेळी महिला राष्ट्रवादीच्या वतीने आरोग्यसेविका व आशा स्वयंसेविका यांना सन्मानपत्र देण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील यांनी केले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील तालुकाध्यक्ष दीपक पवार , बाळासाहेब पाटील , विलासनाना देठे , अनिता पवार,बाळासाहेब जाधव,संतोष नाईकनवरे ,क्षसुग्रीव कोळी,अरुण आसबे,रणजित लामकाने,दिलीप साळुंखे ,कृष्णा माळी,धनंजय बागल,अमोल नागणे,प्रवीण भोसले, प्रकाश देठे,मंगेश देठे,हणमंत सोनवले,महादेव लिंगडे व पदाधिकारी उपस्थित होते.

या शिबिरासाठी पंढरपूर ब्लड बँक यांनी चांगले नियोजन व सहकार्य केले. यावेळी सर्व युवा कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आवाहनाला सामाजिक बांधिलकी म्हणून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!