रेंगाळलेल्या फलटण -पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न, अडचणी जाणून घेण्यासाठी पुण्यात बैठक संपन्न

पंढरपूर- फलटण-पंढरपूर नवीन ल्वे मार्गाचे काम रेंगाळले असून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे प्रयत्न करीत आहेत. यासाठी त्यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना भेटून सर्वेक्षणाची मागणी केली होती. यावर ल्वेमंत्र्यांनी तत्काळ अहवाल मागितला आहे. याबाबतचे काम सुरू झाले आहे. यातील अडचणी जाणून घेण्यासाठी पुणे येथे बैठक बोलाविण्यात आली होती.
यावेळी विभागीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, विभागीय व्यवस्थापक रेणू शर्मा, सहाय्यक व्यवस्थापकदसारेश भाजपे,डॉ. स्वप्निल नीला, श्‍याम कुलकर्णी , नजीब मुल्ला, श्री श्रीनिवास हे उपस्थित होते.
या मार्गावरील नवीनसर्वेक्षणामध्ये अनेक गावांना त्रास होत आहे. अनेक लोकांच्या जमिनी ,घरे यात जात असून व्यवहारिक दृष्टीने हे योग्य नाही, अशी भूमिका खासदार निंबाळकर यांनी घेतली आहे. त्यामुळे संपूर्ण अहवाल हा जुन्या सर्वेक्षणानुसार केला गेला पाहिजे असे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच यावेळी फलटण ते बारामती रेल्वेमार्गाचा आढावा घेण्यात आला. त्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्यांचे हस्तांतरण व जमिनीचा मोबदला याबाबतही बैठकीमध्ये चर्चा झाली.
फलटण – पंढरपूर मार्ग जुन्या निर्धारित मार्गानेच करावा तसेच हैदराबाद- मुंबई बुलेट ट्रेन मार्ग याबाबत चर्चा झाली. पुणे ते फलटण रेल्वे वाहतूक लवकर सुरू करण्यात येत असून यासाठी ल्वेमंत्री पीयूष गोयल येणार आहेत . माढा तालुक्यातील रेल्वेच्या थांब्याच्या संदर्भामध्ये माजी जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव कांबळे यानी सुचविलेल्या कामाबद्दल चर्चा करून त्यांनी दिलेले प्रस्तावमार्गी लावण्याचे आदेश या बैठकीत देण्यात आले.

8 thoughts on “रेंगाळलेल्या फलटण -पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला गती देण्याचे प्रयत्न, अडचणी जाणून घेण्यासाठी पुण्यात बैठक संपन्न

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!