२०१९ च्या निवडणुकीत समाधान आवताडे यांच्या मतांची टक्केवारी २०१४ च्या तुलनेत वाढली ,तर अन्य उमेदवारांची घटली

आमदार कै. भारत भालके यांच्या निधनाने रिक्त झालेल्या पंढरपूर मतदारसंघात पोटनिवडणूक केंव्हाही जाहीर होवू शकते. यासाठी सर्वच गटांची तयारी आहे. मागील दोन निवडणुकात जिद्दीने लढणा उद्योजक समाधान आवताडे या निवडणुकीत उतरणार हे निश्‍चित आहे. मागील दोन निवणुकांचा विचार केला तर त्यांच्या मतांची टक्केवारी वाढत असल्याचे दिसत आहे. मंगळवेढ्यात त्यांचा राजकीय पाया भक्कम आहे , त्यांना आता ताकदीने पंढरपूर भागात आपले पाय रोवावे लागणार आहेत हे निश्‍चित.

प्रशांत आराध्ये
पंढरपूर– पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात मागील 2014 व 2019 या दोन विधानसभा निवडणुकांचा विचार केला तर येथे तिरंगी लढती झाल्या. यात समाधान आवताडे यांनी तिसऱ्या क्रमांकाची मते मिळविली असली तरी 2014 च्या तुलनेत 2019 ला त्यांच्या मतांमध्ये जवळपास पाच टक्के मतं वाढली आहेत. तर पहिल्या दोन उमेदवारांच्या मतांची टक्केवारी कमी झाल्याचे दिसून येते.
उद्योजक समाधान आवताडे हे मंगळवेढा भागातील असल्याने त्यांना तेथून मोठ्या प्रमाणात मतदान होते हे दिसून आले आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत ते मंगळवेढा तालुक्यात क्रमांक एकवर राहिले व त्यांनी एकूण 54 हजार 124 मतं मिळविली आहेत. त्यांना पंढरपूर भागात मतदान कमी मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. 2019 च्या मतदानाची आकडेवारी पाहिली तर राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांना 89 हजसा 787 मते मिळाली होती याची टक्केवारी 37.48 इतकी होते तर भाजपाचे सुधाकरपंत परिचारक यांना 76426 मते मिळाली होती. ही टक्केवारी 31.90 इतकी होते. अपक्ष समाधान आवताडे यांनी 54 हजार 124 मते घेतली व त्यांची मत टक्केवारी 22.59 टक्के इतकी होते. ( 2019 च्या निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 39 हजार 691 म्हणजे 71.74 टक्के इतके झाले होते.)
2014 ला तत्कालीन काँग्रेस उमेदवार भारत भालके यांना 91 हजार 863 मते मिळाली होती. याची टक्केवारी 40.03 इतकी होते. दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले महायुतीचे उमेदवार प्रशांत परिचारक यांना 82 हजार 950 मतं मिळाली होती याची टक्केवारी 36.15 होते. तर शिवसेनेकडून उभे राहिलेल्या समाधान आवताडे यांना 40 हजार 910 मतं मिळाली होती तर याची टक्केवारी 17.83 टक्के होती.( 2014 च्या निवडणुकीत एकूण मतदान 2 लाख 29 हजार 492 इतके झाले होते. याची एकूण टक्केवारी 75.46 टक्के होती.)
यामुळे दोन निवडणुकांचा तिरंगी लढतीचा विचार केला तर दोन्ही वेळा आमदार राहिलेले भारत भालके व परिचारक यांच्या मतांची टक्केवारी कमी होताना दिसते. भालके यांना 2014 ला 40 टक्क्याहून अधिक मते होती तर 2019 ला 37.48 टक्के तर परिचारक यांना 2014 ला 36.15 तर 2019 ला 31.90 टक्के मते मिळाली आहे. समाधान आवताडे यांना मात्र 2014 ला 17.83 तर 2019 ला 22.59 टक्के मते मिळाली होती.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!