विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन; कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळवून देण्याची मागणी

पंढरपूर- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याशी संबंधितांना न्याय मिळावा अशी मागणी येथील श्री विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्याकडे केली आहे.

श्री विठठ्ल सहकारी साखर कारखान्याचे सभासद या नात्याने हे निवेदन आम्ही देत असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. गळीत हंगाम 2018-2019 मधील गाळप केलेलया उसापोटी शेतकऱ्यांची शिल्लक एफआरपीची थकीत रक्कम त्वरित द्यावी, कामगारांचा थकलेले वेतन तातडीने मिळावे , गळीत हंगाम 2020-2021 मध्ये साखर कारखाना सुरू करावा, ज्या कामगारांना कामावरून कमी केलेले आहे त्यांना कामावर घेण्यात यावे, वाहतुकदारांची वाहतूक बिले व कमिशन पोटीची थकीत रक्कत ताबडतोब मिळावी. अशा मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. यावर श्री विठ्ठल बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.बी. पी. रोंगे, शेखर भोसले, बळीराजा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष माउली हळणवर, पांडुरंग नाईकनवरे, दीपक भोसले, पांडुरंग देशमुख यांच्या सह्या असून यावेळी नारायण मेटकरी, डॉ. धर्तीराज शिंदे, सुभाष होळकर, अंकुश शेंबडे, दिलीप भोसले, शिवाजी रणदिवे यांच्यासह उत्तम बाबा चव्हाण, माउली भोसले, सचिन अटकळे, बापू नवले उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!