विठ्ठल सह. साखर कारखाना १५ आँक्टो. पर्यंत थकीत ऊसबिलं , वेतन देणार

पंढरपूर – आमदार भारत भालके यांनी प्रयत्न केल्यामुळे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला शासनाची हमी मिळाली आहे. राज्य शिखर बँकेकडून ३० कोटी रूपये लवकरच प्राप्त होतील. ऊस उत्पादक , वाहतूकदार यांची बिलं व कामगारांचे वेतन गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी १५ आँक्टोंबरपर्यंत दिले जाईल अशी ग्वाही उपाध्यक्ष लक्ष्मण पवार यांनी दिली.

कारखान्यात सन २०२०-२१ गळीत हंगामासाठी बाँयलर अग्निप्रदीपन संचालक भगीरथ भालके व त्यांच्या पत्नी सौ.प्रणिता भालके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ह.भ.प.किरणमहाराज बोधले, मर्चंट बँकेचे माजी अध्यक्ष संजय भिंगे, सर्वा संचालक उपस्थित होते. श्री. पवार म्हणाले , ऊस उत्पादकांना मागील २०१८-१९ च्या एफआरपीची ९६% रक्कम देण्यात आली आहे. उर्वरित १७७ ₹ प्रतिटन देणे आहे, ते हंगाम सुरु होण्यापूर्वी दिले जाईल.

श्री.भगीरथ भालके म्हणाले, या गळीत हंगामासाठी कारखान्याकडे २४,९२२ एकर उसाची नोंद आहे. १३ लाख २५ हजार टन ऊस यंदा उपलब्ध होईल. सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस देवून सहकार्य करावे. यावेळी कार्यकारी संचालक आर.एस. बोरावके यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जनहितचे आंदोलन

श्री विठ्ठल कारखान्यात बाँयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम सुरू असताना बाहेर जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर भैय्या देशमुख व सहकारी थकीत ऊसबिलासाठी आंदोलन करत होते. तालुका पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!