शनिवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 95 रुग्ण वाढले, 111 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शनिवार 31 ऑक्टोंबर रोजी एकूण 95 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 22 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 111 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शनिवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 6 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30772 इतकी झाली असून यापैकी 27435 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2420 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 111 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 917 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 6 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 22 रूग्ण वाढले

पंढरपूर- शनिवार 31 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 7 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 15 असे 22 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 141 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 180 झाली आहे.एकूण 445 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5516 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “शनिवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 95 रुग्ण वाढले, 111 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 3:50 am
    Permalink

    I have fun with, lead to I found exactly what I was taking a look for. You have ended my four day lengthy hunt! God Bless you man. Have a great day. Bye

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!