सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये शुक्रवारी 248 रुग्ण वाढले, एकूण संख्या 30677

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 30 ऑक्टोंबर रोजी एकूण 248 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर व माळशिरस तालुक्यात प्रत्येकी 64 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 214 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 30677 इतकी झाली असून यापैकी 27324 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2442 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 214 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 911 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 64 रूग्ण वाढले

पंढरपूर- शुक्रवारी 30 ऑक्टोंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 14 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 50 असे 64 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 119 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 177 झाली आहे.एकूण 463 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5479 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!