शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ओंकार जोशी मित्रमंडळाच्या शिबिरात 129 जणांचे रक्तदान

पंढरपूर – येथील ओंकार जोशी मित्र मंडळ आणि घोंगडे गल्ली परिवाराच्या वतीने शिवराज्याभिषेक दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 129 जणांनी रक्तदान केले. प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून या शिबिरास प्रारंभ करण्यात आला.
याचे उद्घाटन अनिल महाराज बडवे, प्रशांत वांगीकर ,गोविंदराव भातलवंडे , विनय महाराज बडवे , राजू उराडे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. या शिबिरामध्ये 129 जणांनी रक्तदान करून आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. आजवर 132 वेळा रक्तदान केलेल्या भजनदास लेंगरे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
सध्या कोरोना महामारीच्या काळात रक्ताची आवश्यकता भासत आहे. यासाठी अनेक रक्तपेढ्यांनी रक्तदान करण्याचे आवाहन केले. याला प्रतिसाद देत ओंकार जोशी मित्र परिवाराच्या वतीने तत्काळ रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रत्येक रक्तदात्यास आरोग्याची काळजी घेण्यासाठी एक मास्क आणि सॅनिटायझर बाटली भेट देण्यात आली. याप्रसंगी घोगडे गल्लीतील सर्व सदस्य आणि ओंकार जोशी मित्रमंडळाचे सर्व सदस्य आणि कार्यकर्ते यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतल.
प्रतिवर्षी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंढरपुरातून असंख्य कार्यकर्ते रायगडावर जात असतात. तसेच येथे अनेक ठिकाणी सार्वजनिक शिवराज्याभिषेक दिन साजरा होतो. मात्र यंदा कोरोना संकटामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने आली आहेत. अशावेळी समाजहिताच्या दृष्टीकोनातून रक्तदान शिबिरास सारखा सामाजिक उपक्रम या मित्रमंडळाने राबविला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!