शुक्रवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 121 रूग्ण वाढले तर 219 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) शुक्रवारी 4 डिसेंबर रोजी एकूण 121 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 35 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 219 जणांनी कोरोनावर मात केली आहे. शुक्रवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 3 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता दिवाळीनंतर काही तालुक्यात वाढताना दिसत आहे. तर या आजारावऱ मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही मोठी आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 36010 इतकी झाली असून यापैकी 33427 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1533 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 219 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 1050 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 3 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 28 रूग्ण वाढले

पंढरपूर– शुक्रवार 4 डिसेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 10 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 18 असे 28 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 7 हजार 423 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 216 झाली आहे. सध्या एकूण 546 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 6641 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “शुक्रवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 121 रूग्ण वाढले तर 219 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 6:02 am
    Permalink

    Hey there, You’ve done an incredible job. I will certainly digg it and personally recommend to my friends. I am sure they will be benefited from this website.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!