शुभ वार्ता : उजनीत दौंडजवळून 9040 क्युसेकची पाण्याची आवक, धरण चोवीस तासात दोन टक्के वधारले

पंढरपूर – भीमा खोर्‍यात होत असलेल्या पावसामुळे उजनी धरणात आता दौंडजवळून 9 हजार 40 क्युसेकने पाणी मिसळत असून प्रकल्प अवघ्या चोवीस तासात दोन टक्के वधारला आहे. या पावसाळा हंगामात एवढ्या प्रमाणात प्रथमच पाणी दौंडजवळून उजनीत येवू लागले आहे.
पुणे भागात मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात झाली आहे. सध्या रोजच काही धरणांवर चांगला तर अन्यत्र किरकोळ स्वरूपाचा पाऊस नोंदला जात आहे. मागील चोवीस तासात उजनी वगळता अन्यत्र पावसाची हजेरी दिसत आहे. भीमा व तिच्या उपनद्यांच्या परिसरात तेथील धरणांच्या पुढील भागात नद्यांच्या परिसरात होत असलेल्या पावसाने. काही बंधाऱ्यांचे दरवाजे उघडल्याने उजनीकडे पाणी येत आहे. 21 जून सोमवारी सकाळी दौंंड येथील पाण्याची पातळी 498.40 मीटर होती तर 9040 क्युसेक पाणी उजनी जलाशयात मिसळत होते.
दरम्यान 20 जून रोजी सकाळी धरणाची स्थिती ही वजा 16.49 टक्के होती तर सोमवारी सकाळी चोवीस तासानंतर यात दोन टक्के पाण्याची भर पडल्याने ती वजा 14.46 टक्के अशी झाली आहे. जवळपास एक टीएमसी पाणी जलाशयात आले आहे. ही उजनीसाठी शुभवार्ता आहे. प्रकल्प वजा पातळीत असल्याने तो लवकरच उपयुक्त पातळीत भरण्यास सुरूवात होईल. यासाठी भीमा खोर्‍यात आणखी दमदार पावसाची गरज आहे.
मागील चोवीस तासात मुळा मुठा व अन्य उपखोर्‍यात हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस नोंदला गेला आहे. सर्वाधिक पर्जन्यमान टेमघरवर 50 मि.मी. इतके झाले आहे. उजनी प्रकल्पावर मागील चोवीस तासात पावसाची हजेरी नसली तरी जून महिन्यात येथे एकूण 97 मि.मी. पाऊस पर्जन्यमान नोंदले गेले आहे.
उजनी धरण या पावसाळा हंगामात वजा 22.42 ते वजा 14.46 अशा स्थितीत आले असून जवळपास आठ टक्के पाण्याची यात वाढ झाली आहे.
*Ujjani Dam* :-
Daily Gauges —
Date —- 21/06/2021 at 6.00 hrs
RWL —— 489.850 m.
Water Sp.Area —176.45 Sq.km.
*-Storage-*
Gross ——- 1583.44 M Cum.
——– (55.91 TMC)
Live ——– -219.37 M Cum.
——— ( -7.75 TMC)
Live % ——– *-14.46 %*
Rainfall ( Today’s / Cumulative ) ——– 00/97 mm.
Evaporation ——– 5.72 mm.
*River Gauging Station @ Daund :-*
River Water Level – 498.740 m.
Inflow Discharge – 9040 Cusecs.( KT Weir Released Discharge )
*Outflow :-*
1) Sina Madha LIS -00 cusecs.
2) Dahigaon LIS – 00 Cusecs.
3) Tunnel – 00 cusecs.
4) Main Canal – 00 Cusecs.
5) Power House – 00 Cusecs.
6) Spillway — 00 Cusecs.
7) River Sluices — 00 Cusecs.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!