श्री विठ्ठल रूक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी होणार वज्रलेप, आषाढीपूर्वी प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता

पंढरपूर, –  श्री विठ्ठल व रूक्मिणी मूर्ती संवर्धनासाठी वज्रलेप करण्याची परवानगी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मागितली होती. यास मान्यता देण्यात आली असून सध्या लॉकडाऊनमुळे मंदिर असल्याने आषाढीपूर्वीच ही वज्रलेपनाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा मानस समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी व्यक्त केला आहे.
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने 16 मार्च रोजी राज्य शासनाच्या न्याय व विधी खात्याकडे मूर्तींना वज्रलेप करण्याची परवानगी मागितली होती. यास आज 4 जून रोजी मान्यता देण्यात आली आहे. सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने या काळातच पुरातत्व विभागाकडून हे वज्रलेपन करून घेण्यात येणार आहे. आषाढीपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी ही मूर्तीवर वज्रलेप करण्यात आलेले  आहेत. 2012 मध्ये आठ वर्षापूर्वी शेवटचा वज्रलेप करण्यात आला होता. दर पाच वर्षानंतर मूर्तींना हा लेप द्यावा अशी सूचना पुरातत्व विभागाने केली आहे. मागील काही महिन्यांपूर्वी औरंगाबाद येथील पुरातत्व विभागाच्या अधिकार्‍यांनी मूर्तीची पाहणी केली  होती व वज्रलेप करण्याची शिफारस केली होती. यानंतर मंदिर समितीने न्याय व विधी खात्याकडे यासाठी परवानगी मागितली  होती. आता यास मान्यता मिळाली आहे.
विधी व न्याय विभागाने मूर्ती संवर्धन प्रस्ताव मंजूर करून परवानगी दिलेली आहे , पुरातत्व विभागाच्या तज्ज्ञांची वेळ घेऊन शक्यतोवर आषाढीपूर्वी दर्शन बंदच्या कालावधीत ही प्रक्रिया पूर्ण  करून घेण्याचा प्रयत्न राहिल असे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!