श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वाखरीत आगमन… माउली..माउली..म्हणत वाटेत “बस”चे दर्शन अनेक भाविकांनी घेतले

पंढरपूर- आषाढीसाठी श्रीक्षेत्र आळंदीतून सोमवारी सकाळी सोमवारी सकाळी निघालेला संत ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा दुपारी वाखरीत दाखल झाला.

वाटेत ठिकठिकाणी भाविकांनी पालखी ठेवलेल्या एसटी बसचे दर्शन घेवून तेथूनच वारी पंढरीनाथाला पोहोचवली. कोरोनामुळे यंदाची वारीही प्रतीकात्मक साजरी होत आहे.

वाखरीत पालखीचे स्वागत श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीच्या वतीने करण्यात आले. यावेळी सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकळ, जिल्हा पोलीस प्रमुख तेजस्वी सातपुते, उपजिल्हाधिकारी सचिन ढोले, पोलीस उप अधीक्षक विक्रम कदम, मंदिर समिती कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी उपस्थित होते.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!