सकारात्मक बातमी : ओंकार जोशी मित्र मंडळाकडून पंढरपूरमध्ये मोफत पोस्ट कोविड क्लिनिक सुरू

पंढरपूर – येथील ओंकार जोशी मित्र मंडळाच्या वतीने पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्यात आले. याचे उद्घाटन आमदार प्रशांत परिचारक यांच्या हस्ते झाले. कोरोनानंतरच्या आजारामध्ये रूग्णाना मोफत उपचार मिळावे, यासाठी हे क्लिनिक सुरू करण्यात आले आहे.
येथील घोंगडे गल्ली येथील ओंकार जोशी यांच्या संपर्क कार्यालयात पोस्ट कोविड क्लिनिकचे उद्घाटन झाले. यावेळी ॲड. सारंग आराध्ये , डॉ. अनिल जोशी , डॉ. श्रीराज काणे, माजी नगराध्यक्ष पांडूरंग घंटी , नगरसेवक अनिल अभंगराव , ऋषिकेश उत्पात , श्रीकांत हरिदास , राजाभाऊ उराडे, पिनू परचंडे उपस्थित होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर कोरोनाबाधित होऊन गेल्यानंतरच्या आजाराचे प्रमाण रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढले आहे. हीच बाब लक्षात घेऊन ओंकार जोशी यांनी डॉ. श्रीराज काणे यांच्या मदतीने मोफत पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्याचा ठरवले. संबंधित क्लिनिक हे मंगळवार आणि शुक्रवार असे आठवड्यातून केवळ दोन वेळा सुरू असणार आहे. यामध्ये घोंगडे गल्ली येथे मंगळवारी तर डॉ. काणे यांच्या रुग्णालयात शुक्रवारी सुरू असेल. विशेष म्हणजे या क्लिनिकमध्ये वैद्यकीय सल्ला आणि उपचार हे मोफत असणार आहेत. पहिल्याच दिवशी असंख्य रुग्णानी या पोस्ट कोविड रुग्णालयाचा लाभ घेतला.
कोरोनाबाधित झाल्यावर मध्यंतरी अनेक रुग्णांनी रुग्णालयात तर काहींनी गृहविलगीकरणामध्ये उपचार घेतले. यानंतरही रूग्णाना काही शारीरिक समस्याना तोंड द्यावे लागत आहे. अशा रुग्णांनी कुठलीही शारीरिक अडचण घरगुती उपायावर न सोडवता वैद्यकीय सल्ल्यानेच दूर करावी. यासाठीच पोस्ट कोविड क्लिनिक सुरू करण्यात आले आहे. यांचा लाभ गरजू रूग्णांनी घ्यावा. आणि आपले आरोग्य सुस्थितीत ठेवावे. असे आवाहन ओंकार जोशी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!