सेवानिवृत्तीधारकांना डाक विभाग देणार हयातीचा दाखला

पंढरपूर, दि. 11 : डाक ( पोस्ट कार्यालय ) विभागामार्फत नागरिकांसाठी विविध योजना कार्यरत असून, आता केंद्र व राज्यशासकीय सेवानिवृत्तीधारकांना आवश्यक असणारा हयातीचा दाखला डाक विभागामार्फत देण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती पंढरपूर विभागाचे डाकघर अधीक्षक एन.रमेश यांनी दिली.

केंद्र व राज्यशासकीय सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना शासनाकडून सेवानिवृत्ती वेतन मिळते. यासाठी सर्व सेवानिवृत्तीधारकांना हयात असल्याबातचा दाखला संबधित विभागाकडे जमा करावा लागतो. यास्तव पेन्शनधारकांना महाईसेवा केंद्र, आपले सरकार आदी ठिकाणाहून दाखला तयार करुन तो जमा करावा लागतो. डाक विभागामार्फत सेवानिवृत्त पेन्शनधारकांना जवळच्या पोस्ट ऑफिस अथवा मागणी केल्यास पोस्ट कर्मचाऱ्यांमार्फत घरी येवून दाखला देण्यात येणार आहे. आधार प्रणालीव्दारे ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून, यासाठी पेन्शन ओळखपत्र, पेन्शन पेमेंट ऑर्डर, पेन्शन मंजूरी व वितरण विभागाचे नाव, बँक खाते, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच आधार क्रमांक आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. सर्व सेवानिवृत्त पेन्शनधारकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे, आवाहन एन.रमेश यांनी केले आहे.

खंडित टपाल जीवन विमा पॉलिसीचे पुनर्जीवन करण्यास मुदतवाढ

भारतीय डाक विभागांतर्गत असलेल्या टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा योजनेतील विविध पॉलिसी पैकी ज्या पॉलिसी सतत पाच वर्ष भरणा न केल्यामुळे बंद पडल्या आहेत. त्या विमा पॉलिसींना पुनर्जीवित करण्यासाठी 30 नोव्हेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती डाकघर विभागाचे अधीक्षक एन. रमेश यांनी दिली.

पोस्ट ऑफिस लाईफ विमा नियम 2011च्या अटी व शर्ती मध्ये केलेल्या दुरुस्तीच्या अनुषंगाने टपाल जीवन विमा आणि ग्रामीण टपाल जीवन विमा पॉलिसी धारकांनी सतत पाच वर्षे भरणा न केल्यामुळे पॉलिसी बंद पडल्या असतील तर त्यांचे पुनर्जीवन 31 नोव्हेंबर 2020 पर्यंत करण्यात येणार आहे.तदनंतर कोणत्याही पॉलिसीचे पुनर्जीवन करता येणार नाही त्या नियमानुसार रद्द समजण्यात येतील असेही, अधीक्षक एन. रमेश यांनी कळविले आहे.

3 thoughts on “सेवानिवृत्तीधारकांना डाक विभाग देणार हयातीचा दाखला

  • March 6, 2023 at 8:35 am
    Permalink

    Of course, your article is good enough, slotsite but I thought it would be much better to see professional photos and videos together. There are articles and photos on these topics on my homepage, so please visit and share your opinions.

  • March 17, 2023 at 8:45 am
    Permalink

    Thank you for your own work on this site. Ellie loves setting aside time for research and it’s really easy to understand why. Many of us hear all regarding the powerful ways you create precious guidelines through your blog and cause contribution from the others on that issue while our favorite princess is without a doubt becoming educated a whole lot. Enjoy the rest of the new year. You are always carrying out a glorious job.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!