सोमवारी पंढरपूरमध्ये एकूण 6 कोरोनाबाधितांची वाढ , संख्या पोहोचली 55

पंढरपूर– पंढरपूर शहरात सोमवार 13 जुलै रोजी 6 कोरोनाबाधित वाढले असून एकूण संख्या आता 55 झाली आहे. काल रात्रौ 4 तर आज 2 जणांची भर पडली आहे. 132 अहवाल प्राप्त झाले असून 6 पाँझिटिव्ह तर 126 निगेटिव्ह आहेत.

पंढरपूर व परिसरात आजवर 55 रूग्ण आढळले असून 21 जण उपचारानंतर घरी गेले आहेत. 2 मयत आहेत तर 32 जणांवर उपचार सुरू आहेत.

अनिलनगर येथील एका 57 वर्षीय व्यक्तीला उपचारासाठी 11 जुलै रोजी सोलापूर सिव्हिल रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे ते मयत झाले. त्यांचा कोरोना अहवाल पाँझिटिव्ह आला आहे.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!