सोमवारी पंढरपूर शहर व तालुक्यात 47 कोरोना रूग्ण वाढले

पंढरपूर – सोमवारी 17 आँगस्ट रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर व तालुक्यात 47 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.

आजच्या अहवालानुसार तालुक्यात 18 तर शहरात 29 रूग्ण वाढले आहेत.

पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1781 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 3 जण मरण पावले आहेत. यामुळे कोरोनामुळे प्राण गमावल्यांची एकूण संख्या 31 झाली आहे. 1003 जणांवर उपचार सुरु आहेत. तर 747 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!