सोमवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 107 रुग्ण वाढले तर 107 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) सोमवारी 2 नोव्हेंबर रोजी एकूण 107 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 25 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 107 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सोमवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 5 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. कोरोनाबाधित रूग्णांची आता संख्या कमी होताना दिसून या आजाराव़र मात करून घरी परतणार्‍यांची संख्याच वाढली आहे. जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 31262 इतकी झाली असून यापैकी 28628 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 1707 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 107 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 927 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 5 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 12 रूग्ण वाढले

पंढरपूर- सोमवार 2 नोव्हेंबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 1 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 11 असे 12 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 189 झाली आहे. आजच्या अहवालानुसार 2 जण कोरोनामुळे मरण पावले आहेत. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 185 झाली आहे.एकूण 446 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 5558 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “सोमवारी सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 107 रुग्ण वाढले तर 107 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 2:04 am
    Permalink

    Its excellent as your other content : D, appreciate it for posting. “Age is a function of mind over matter if you don’t mind, it doesn’t matter.” by Leroy Robert Satchel Paige.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!