सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 601 कोरोना रूग्ण आढळले, एकूण संख्या 17339

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाकाक्षेत्र वगळून) रविवारी 13 सप्टेंबर रोजी एकूण 601 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 106 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 136 जणांनी कोरोनावर मात केली आहे. रविवारी अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 13 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 17339 इतकी झाली असून यापैकी 10939 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 5906 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 136 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 494 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 13 जण मयत आहेत.

One thought on “सोलापूर ग्रामीणमध्ये रविवारी 601 कोरोना रूग्ण आढळले, एकूण संख्या 17339

  • March 17, 2023 at 4:44 am
    Permalink

    I have recently started a blog, the info you offer on this web site has helped me greatly. Thanks for all of your time & work.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!