सोलापूर जिल्हा: आजपर्यंत ३५१ जणांची कोरोनावर मात, शुक्रवारी ३० जण घरी परतले

सोलापूर– कोरोना बाधितांची संख्या सोलापूर जिल्ह्यात वाढत असून शुक्रवारी २९ मे रोजी सायंकाळ पर्यंत एकूण ही संख्या ८५१ इतकी झाली आहे. तर आज दिवसभरात ३ जण कोरोनामुळे मृत झाले आहेत. कोरोनामुळे एकूण मृतांचा आकडा आता ७५ झाला आहे. आजपर्यंत कोरोनावर मात करून ३५१ जण घरी परत गेले आहेत. शुक्रवारी ३० जणांना डिसचार्ज देण्यात आला आहे.

आज 29 मे सायंकाळ चा अहवाल
अहवाल – 301
पॉझिटिव्ह- 103
निगेटिव्ह- 198
आजची मृत संख्या- 03
एकूण पॉझिटिव्ह- 851
एकूण निगेटिव्ह – 5878
एकूण चाचणी- 7254
एकूण मृत्यू- 75
एकूण बरे रूग्ण- 351

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!