सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये 4280 जणांची कोरोनावर मात तर 2905 जणांवर उपचार सुरू

पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवार 15 ऑगस्ट रोजीच्या अहवालानुसार अकरा तालुक्यांमध्ये 330 रूग्ण वाढले आहेत तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आज सर्वाधिक कोरोनाबाधित बार्शी तालुक्यात 106 आढळून आले आहे. रँपिड चाचण्या वाढविल्याने गेले काही दिवस पंढरपूर कोरोनाबाधित रूग्णांच्या आकडेवारीत अव्वल होते. मात्र आज हा तालुका 73 रूग्णांसह दुसरा आहे.

या पाठोपाठ माळशिरस तालुक्यात 42 रूग्ण आज आढळून आले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 7 हजार 390 इतकी झाली असून यापैकी 4280 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 2905 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 186 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 205 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.

आजच्या अहवालानुसार 8 जण मयत आहेत. आज 2241 चाचण्या झाल्या यात 1911 अहवाल निगेटिव्ह आहेत तर 330 पॉझिटिव्ह आहेत.
रविवारच्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 10 , बार्शी 106, करमाळा 8 , माढा 30, माळशिरस 42 , मंगळवेढा 19, मोहोळ 10, उत्तर सोलापूर 11, पंढरपूर 73, सांगोला 14 तर दक्षिण सोलापूर 7 .

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!