सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये बुधवारी 411 कोरोना रुग्ण वाढले
पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) बुधवारी 2 सप्टेंबर रोजी एकूण 411 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित पंढरपूर तालुक्यात 114 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 166 जणांनी आज कोरोनावर मात केली आहे. बुधवारच्या अहवालानुसार जिल्हा ग्रामीणमध्ये 7 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 12125 इतकी झाली असून यापैकी 8666 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 3110 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 166 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 349 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 7 जण मयत आहेत.
बुधवार च्या अहवालानुसार तालुकानिहाय पॉझिटिव्ह सापडलेले नवे रूग्ण पुढीलप्रमाणे – अक्कलकोट 11, बार्शी 91, करमाळा 46, माढा 32, माळशिरस 33, मंगळवेढा 11, मोहोळ 15, उत्तर सोलापूर 14 , पंढरपूर 114, सांगोला 33, तर दक्षिण सोलापूर 8.

I’m still learning from you, but I’m making my way to the top as well. I certainly love reading all that is posted on your website.Keep the posts coming. I liked it!