सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरुवारी 237 रुग्ण वाढले तर 366 जण झाले कोरोनामुक्त

सोलापूर– सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात (महापालिकाक्षेत्र वगळून) गुरुवार 8 आँक्टोबर रोजी एकूण 237 कोरोना रुग्ण वाढले आहेत. सर्वाधिक कोरोनाबाधित माळशिरस तालुक्यात 67 आढळले आहेत. दरम्यान ग्रामीण भागात आज 366 जणांनी कोरोनावर मात केली आहे. गुरूवारी जिल्हा ग्रामीणमध्ये 6 जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असला तरी या आजारावर मात करून घरी परतणार्‍यांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान ग्रामीण भागात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 27177 इतकी झाली असून यापैकी 21511 जण कोरोनावर मात करून घरी गेले आहेत तर 4919 जणांवर उपचार सुरू आहेत. आज 366 जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आजवर 747 जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत.आजच्या अहवालानुसार 6 जण मयत आहेत.

पंढरपूर तालुक्यात 60 रूग्ण वाढले

पंढरपूर – गुरुवार 8 आँक्टोबर रोजी आलेल्या जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अहवालानुसार पंढरपूर शहर 22 व तालुक्यात ग्रामीणमध्ये 38 असे 60 कोरोनाबाधित रूग्ण वाढले आहेत.पंढरपूर शहर व तालुक्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 5 हजार 333 झाली आहे. आजवर कोरोनामुळे प्राण गमावलेल्यांची एकूण संख्या 130 झाली आहे.एकूण 720 रूग्णांवर उपचार सुरू असून,आजवर 4483 जण कोरोना आजारातून बरे झाले आहेत .

One thought on “सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये गुरुवारी 237 रुग्ण वाढले तर 366 जण झाले कोरोनामुक्त

  • March 17, 2023 at 7:52 am
    Permalink

    Thank you, I’ve just been looking for information approximately this topic for ages and yours is the greatest I have discovered so far. But, what about the bottom line? Are you positive concerning the supply?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!