सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय, गुरुवारचा आकडा ९३ तर दोन जण मयत

पंढरपूर – सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढताना दिसत असून गुरुवारी ४ मार्च रोजी आलेल्या अहवालानुसार ९३ रूग्ण आढळून आले आहेत. तर दोन जण मयत झाले आहेत.आजवर ग्रामीणमध्ये ४० हजार ८०१ रूग्ण सापडले असून ११८७ जणांनी या आजारात प्राण गमावले आहेत. सध्या ५३४ जण उपचार घेत असून ३९ हजार ८० जण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
गुरुवारी आलेल्या अहवालानुसार ९३ रूग्ण एकाच दिवशी आढळून आले असून सर्वाधिक माळशिरस तालुक्यात २२ आहेत. यापाठोपाठ करमाळा १८, माढा १५, बार्शी ११ तर पंढरपूर तालुक्यात १० कोरोनाबाधित आढळून आले आहेत. गुरुवारच्या अहवालानुसार २ जण कोरोनामुळे मयत असून यात माळशिरस व मंगळवेढा तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे.कोरोनाचे रूग्ण वाढू लागल्याने प्रशासनाने काही निर्बंध ही लागू केले असून रात्र संचारबंदी लागू आहे.
दरम्यान पंढरपूर शहरात ७ तर तालुक्यात ३ रूग्णांची भर गुरुवारी पडली असून येथील एकूण संख्या ८२३५ इतकी झाली आहे. सध्या ५७ जणांवर केवळ उपचार सुरू आहेत. ७९३५ जण उपचार घेवून परत घरी गेले आहेत तर २४३ जणांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. आजवर सोलापूर जिल्हा ग्रामीणमध्ये सर्वाधिक रूग्ण हे पंढरपूर तालुक्यातच आढळून आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

WhatsApp Chat
Send via WhatsApp
error: Don\'t try to copy. Content is protected !!